

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाने मतदारयादी शुद्धीकरणाची मोठी मोहीम फत्ते केली आहे. नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये तांत्रिक आणि प्रत्यक्ष पडताळणीत असलेल्या तब्बल २४ हजार ५८८ दुबार मतदार नोंदी आढळून आल्या असून, त्या मतदार यादीतून वगळण्यात (बाद) आल्या आहेत.
निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार, मतदारयादीतील त्रुटी दूर करण्यासाठी आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी ही विशेष पडताळणी मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेदरम्यान डीएसई (लोकसंख्या शास्त्रीयदृष्ट्या समान माहिती) प्रणालीचा वापर करण्यात आला. यात मतदाराचे नाव, वय, पत्ता आणि प्रामुख्याने छायाचित्र यांची संगणकीय प्रणालीद्वारे तपासणी करण्यात आली.
एकाच व्यक्तीचे नाव दोन किंवा अधिक ठिकाणी आढळल्यास, प्रत्यक्ष पडताळणी करून नियमांनुसा त्यातील एकच नोंद वैध ठेवण्यान आली. विभागात दुबार मतदार नोंदणीन जळगाव जिल्हा पहिल्या क्रमांकाव असून, नाशिक जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे.
निवडणूक विभागान या सर्व प्रकरणांची छाननी करून संबंधित मतदारांची माहिती तपासल असता, एकाच व्यक्तीची दोन किंव अधिक ठिकाणी नावे असल्यास नियमांनुसार एकच नोंद वैध ठेवण्यान आले असून, उर्वरित नावे फॉर्म-प्रक्रियेद्वारे ई-रोलमधून वगळण्या आली आहेत. त्यामुळे विभागातील मतदारयाद्या अधिक अचूक आणि अद्ययावत होण्यास मदत झाली आहे.
आगामी जिल्हा परिषद, तसेच विधानसभा पार्श्वभूमीवर निवडणुकांच्य मतदारयाद शुद्धीकरणाची ही प्रक्रिया अत्यं महत्त्वाची मानली जात आहे. दुबा नावे कायम राहिल्यास मतदान प्रक्रियेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे निवडणूक विभागाने तांत्रिक साधनांच वापर करून अशा नोंदी शोधून काढल्याने मतदारयादीच्या विश्वासार्हतेत वाढ होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.