

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
घरगुती गॅस सिलिंडर बुकिंगनंतर साधारणतः २ ते ३ दिवसांत सिलिंडर ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यात येतील, नागरिकांनी गॅस एजन्सीवर अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सीमा अहिरे यांनी केले.
पुरवठा अधिकारी अहिरे म्हणाल्या की, सध्या काही ठिकाणी गॅस वितरणाबाबत संभ्रम निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने परिस्थिती स्पष्ट केली आहे. गॅस वितरणाची प्रक्रिया नियमितपणे सुरू असून नागरिकांनी संयम राखून अधिकृत माध्यमातूनच सिलिंडर बुकिंग करावे, असेही सांगण्यात आले आहे.
ज्या ग्राहकांनी अद्यापपर्यंत केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांनी तातडीने केवायसी करून घ्यावी. त्यामुळे गॅस वितरण प्रक्रियेत कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, संभाव्य परिस्थितीच्या अनुषंगाने गॅस वितरणावर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक येथे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
गॅस वितरणासंदर्भात काही अडचण असल्यास नागरिकांनी (०२५३) २३१७१५१ या दूरध्वनी क्रमांकावर सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत संपर्क साधावा, नागरिकांनी गॅस सिलिंडर बुकिंगसाठी उपलब्ध असलेल्या डिजिटल व दूरध्वनी सुविधांचा वापर करून घरबसल्या बुकिंग करावे व गॅस एजन्सींवर अनावश्यक गर्दी टाळून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी अहिरे यांनी केले आहे.
गॅस बुकिंगसाठी उपलब्ध सुविधा
एचपीसीएल (HPCL) व्हॉट्सअॅप बुकिंग ९२२२२०११२२ मिस्ड कॉल बुकिंग - ९४९३६०२२२२ HP Pay App द्वारे बुकिंग कॉल बुकिंग - ८८८८८२३४५६ ऑनलाइन - www.hindustanpetroleum.com G$/myhpgas.in इतर माध्यम GPay, PhonePe, Amazon Pay
https://www.youtube.com/watch?v=BvhEiSQtikIआयओसीएल
व्हॉट्सअॅप बुकिंग ७५८८८८८८२४ मिस्ड कॉल बुकिंग - ८४५४९५५५५५ SMS/IVR - ७७१८९५५५५५ ऑनलाइन cx.indianoil.in इतर माध्यम - GPay, PhonePe, Amazon Pay
बीपीसीएल
व्हॉट्सअॅप बुकिंग १८००२२४३४४ मिस्ड कॉल बुकिंग - ७७१०९५५५५५ IVRS - ७७१५०१२३४५ / ७७१८०१२३४५ Hello BPCL -pp ऑनलाइन - www.bharatgas.comG$ /bharatpetroleum.in इतर माध्यम GPay, PhonePe, Amazon