Nashik Minor Minerals Revenue |गौणखनिज वसुलीला दोनशे कोटींचे लक्ष्य

Nashik Minor Minerals Revenue | नाशिक तालुक्याला सर्वाधिक 45 कोटी 4 लाखांचे उद्दिष्ट
Zilla Parishad Nashik / जिल्हा परीषद नाशिक
Zilla Parishad Nashik / जिल्हा परीषद नाशिकPudhari News Network
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यस्तरावरून जिल्ह्याला २०२६-२७ वर्षासाठी गौणखनिज वसुलीचा दोनशे कोटींचा लक्ष्यांक दिला आहे. जिल्हा प्रशासनाने प्राप्त लक्ष्यांनुसार १५ ही तालुक्यांना उद्दिष्ट ठरवून दिले आहे. यात नाशिक तालुक्याला सर्वाधिक ४५ कोटी ४ लाखांची वसुली करावी लागणार आहे.

Zilla Parishad Nashik / जिल्हा परीषद नाशिक
Shalarth ID scam | नाशिक विभागातील 841 शालार्थ आयडी बनावट! जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक 638 प्रकरणांचा फटका

राज्य शासनाने ऑगस्ट महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात जिल्ह्याला महसूल वसुलीचे उद्दिष्ट ठरवून दिले. त्यामध्ये चालू वर्षी गौणखनिज वसुलीत दोनशे कोटी २० लाखांचा लक्ष्यांक दिला आहे. गेल्या आर्थिक वर्षाशी तुलना केल्यास यंदा गौणखनिजच्या उद्दिष्टात ५० कोटींची घट सरकारने केली. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला काहीसा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, जिल्हा प्रशासनाने प्राप्त लक्ष्यांनुसार तालुक्यांना उद्दिष्ट ठरवून दिले आहे. हे उद्दिष्ट देताना प्रशासनाने नाशिक तालुक्यावर यंदा मेहरनजर दाखवली आहे. दरवर्षी राज्यस्तरावरून लक्ष्यांक प्राप्तीनंतर त्यातील साधारणतः ६० ते ६५ टक्के उद्दिष्ट हे केवळ नाशिक तालुक्यावर सोपवण्यात येत होते.

मात्र, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक तालुक्यावरील हा भार यंदा दूर केला असून, नाशिक तालुक्याला चालू वर्षी गौणखनिजचे ४५.४ कोटींचा लक्ष्यांक ठरवून दिला आहे. त्यामध्ये नाशिक तहसीलला २३.२० कोटी, तर नाशिक अपर तहसीलच्या २२.२० कोटींचा समावेश आहे. याव्यतिरिक्त सिन्नरला २७.०२ कोटी, दिंडोरीला २२ कोटी लक्ष्यांक असेल. त्या तुलनेत मालेगावच्या उद्दिष्टात घट करताना १९.१५ कोटींचा लक्ष्यांक प्रशासनाने दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news