Crime Case | कामटवाडे खूनप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय; आरोपी आनंद आंबेकरला जन्मठेपेची शिक्षा

Crime Case | मृताच्या आई-वडिलांना एक लाखांची नुकसानभरपाई
Court
CourtFile Photo
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत कामटवाडे रोडवरील मरिमाता मंदिराजमोर झालेल्या खूनप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आनंद देवराम आंबेकर (२९, रा. शिवपुरी चौक, सिडको) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने जन्मठेपेसह पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला असून, मृतांच्या आई-वडिलांना नुकसानभरपाई म्हणून एक लाख रुपये देण्याचे आदेशही दिले आहेत.

Court
President Droupadi Murmu | राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नाशिक-त्र्यंबकेश्वर दौरैनंतर प्रशासकीय स्तरावर होणार महत्त्वाचे 'डी-ब्रीफिंग'

ही घटना ५ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी साडेपाच ते सहा वाजेच्या सुमारास कामटवाडे रोडवरील मरिमाता मंदिराजमोर घडली होती. या प्रकरणातील फिर्यादी वसंत इंगळे यांचा मुलगा आनंद याला आरोपीने शिवीगाळ करीत फरशीने त्याच्या डोक्यावर वार केला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आनंदचा मृत्यू झाला होता.

याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन सहायक पोलिस आयुक्त शेखर देशमुख यांनी तपासाची सूत्रे हाती घेत सहायक पोलिस उपनिरीक्षक रवी शिरोळे यांनी तपासात सहकार्य करत तपासादरम्यान पोलिसांनी भक्कम पुरावे संकलित करून आरोपीविरोधात जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

Court
Nashik ZP to NASA | जिल्हा परिषदेच्या तीन शिक्षकांना मिळणार 'नासा' दौर्याची सुवर्णसंधी; 'नाशिक ते नासा' उपक्रमांतर्गत मोठी घोषणा

नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात खटल्याची सुनावणी सुरू होती. जिल्हा सत्र न्यायाधीश आर. एन. पांढरे यांनी फिर्यादी, साक्षीदार, पंच तसेच तपास अधिकारी यांनी सादर केलेल्या पुराव्यांचा विचार करून आरोपीला दोषी ठरविले. त्यानुसार, भारतीय दंड विधानातील खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावण्यात आली.

तसेच मृताच्या आई-वडिलांना एक लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. ही रक्कम न दिल्यास एक वर्ष साध्या काराவாசचा शिक्षा सुनावण्यात आली आहे.
या खटल्यात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता भानुप्रिया पेटकर आणि आर. पी. गावित यांनी युक्तिवाद केला. खटल्याच्या कामकाजासाठी पोलिस उपनिरीक्षक सुदाम सांगळे, कोर्ट अंमलदार रंजना गायकवाड, पाठपुरावा अंमलदार पोलिस हवालदार रामनाथ आजगे आणि अंबड पोलिस ठाण्याच्या पथकाने विशेष प्रयत्न केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.