

नाशिकरोड : नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या २५ डिसेंबरला दिव्यांग कल्याण बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे.
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन आणि आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात येणार आहे. हा कार्यक्रम बोधलेनगरच्या कृष्णा लॉन्स येथे होणार आहे. आयोजक दीपक जयराम शेवाळे दिव्यांग कल्याण बहुउद्देशीय सामाजिक संस्था सरचिटणीस यांनी दिव्यांगाणी या क्रेमराला उपस्थित राहून लाभ घेण्याचे आव्हान केले आहे.