

देवळा ; तालुक्यातील सरस्वती वाडी येथे सोमवारी दि ९ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने चारा ,ट्रॅक्टर व कांद्याची चाळ जाळण्याचा प्रयत्न केला असून,यात पाच ट्रॉली चारा जळून खाक झाला आहे .या घटनेबाबत देवळा पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की ,देवळा तालुक्यातील सरस्वती वाडी येथील ग्रामपंचायत सदस्य व प्रगतिशील शेतकरी सतीश आहेर यांच्या शेतातील राहत्या घराजवळ कांद्याची चाळ असून, लगतच आहेर यांनी जनावरांसाठी मक्याचा पाच ट्रॉली चारा रचून ठेवला होता. सोमवारी दि ९ रोजी रात्री साडे बारा वाजेच्या सुमारास अज्ञात इसमाने सदर चाऱ्याला आग लावली .व यात संपूर्ण चारा जळून खाक झाला. तसेच संबंधित इसमाने ट्रॅकर व कांद्याची चाळ, गुरे देखील जाळून टाकण्याचा प्रयत्न केला असता तो आहेर यांच्या सतर्कतेमुळे फसला ., तशी तक्रार शेतकरी आहेर यांनी देवळा पोलीस ठाण्यात दिली आहे . सदर आग विझविण्यासाठी देवळा नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी परिश्रम घेतले .या आगीत आहेर यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे .अज्ञात इसमाविरुद्ध देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून,अधिक तपास पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते करीत आहेत .