Jayakwadi Dam Water Level: मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी! नाशिकमध्ये पावसाचा जोर, 'जायकवाडी'ला मिळणार पाणी

1100 क्यूसेक्स वेगाने पाण्याचा विसर्गः जायकवाडीमध्ये उद्या संध्याकाळपर्यंत पाणी पोहचू शकते
Nashik Heavy Rain
जायकवाडी धरणFile Photo
Published on
Updated on

Jayakwadi Dam Water Level:

नाशिक : गेले दोन दिवस सुरु असलेल्‍या मुसळधार पावसाने नाशिक मधील दारणा धरण 50 टक्के भरल्याने आज धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. जवळपास प्रतिसेंकद 1100 क्यूसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तसेच गंगापूर धरणही ४८ टक्‍के भरले आहे. 3228 वरून 4842 क्यूसिक्स वेगाने पाणी प्रवाहित होत आहे. नांदूर माध्यमेश्वर धरणात पाणीसाठा वाढल्याने विसर्गात वाढ झाली आहे. हे सर्व प्रवाहीत पाणी उद्या संध्याकाळपर्यंत जायकवाडी धरणापर्यंत पोहचण्याची शक्‍यताआहे. यामुळे मराठवाड्यातील पाणीटंचाईचा प्रश्न कमी होणार आहे.

Nashik Heavy Rain
Heavy Rain Nashik | नाशिकसह जिल्ह्यात धुवाधार

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून इगतपुरी परिसरात जोरदार सुरू असलेल्या पावसामुळे व नाशिकच्या पूर्व भागात पावसाचा जोर कायम असल्‍याने नदी नाले तुडूंब भरुन वाहत आहेत. परिणामी परिसरातील पाणलोट क्षेत्राात जोरात पाऊस सुरु असून पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. नाशिक क्षेत्रातील अनेक धरणे ५० टक्क्यांवर गेली आहेत. पावसाचा जोर कायम असल्‍याने या धरणातून विसर्ग वाढवला आहे. हे पाणी मराठवाड्यातील धरणामध्ये जात असल्‍याने मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

दरम्‍यान पाण्याचा विसर्ग वाढवल्‍यामुळे दारणा नदी परिसरात राहणाऱ्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्‍याचबरोबर दारणासह पालखेड धरणातून देखील होणार पाण्याचा विसर्ग वाढवला जााणार आहे. तसचे काल रात्रीपासून नाशिक सह त्रंबकेश्वर, इगतपुरी, दिंडोरी परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्‍याने अनेक धरणे लवकर भण्याची शक्‍यता आहे.

Nashik Heavy Rain
Nashik Heavy Rain : मुसळधार पावसाने जिल्ह्यात कहर, पिकांसह पशुधनाचे नुकसान

असा आहे विसर्ग 

दारणा धरणः ११०० क्‍युसेक प्रतिसेकंद

गंगापूरः ४८४२ क्‍युसेक प्रतिसेकंद

प्रमुख धरणात सध्याचा असलेला पाणीसाठा

दारणा धरण ५० % भरले आहे २६२१ दशलक्ष घनफूट जलसाठा

गंगापूर धरणात ४४% जलसाठा आहे, म्हणजे २५०१ दशलक्ष घनफूट जलसाठा

कश्यपी धरणात २९ % भरले आहे, ५३८ दशलक्ष घनफूट जलसाठा आहे.

गौतमी गोदावरी धरणात ८.८९% जलसाठा आहे, म्हणजे १६९ दशलक्ष घनफूट.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news