

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क | परिसरसरातून दाजीबा वीर मिरवणुकीला जल्लोषात सुरुवात झाली आहे. शुक्रवारी (दि.14) जुने नाशिक येथून शेकडो वर्षांची ही परंपरा जपली जात आहे. डोक्यावर बाशिंग बांधून वाजत गाजत मिरवणूक काढली जाते. लहान मुलांनाही या मिरवणुकीत नाचवले जाते. पारंपरिक वाद्याच्या गजरात दाजीबा वीर नाचतात. नाशिकमध्ये सुमारे तीनशे वर्षांपासून ही परंपरा कायम आहे. नवसाला पावणारा देव असा नागरिकांची भावना आहे. होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच धुळवडच्या दिवशी शहरात वीराची मिरवणूक काढली जाते.
नाशिकमध्ये होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच धुलिवंदन दिवशी वीर दाजीबा बाशिंग मिरवणूक काढण्याची एक अनोखी परंपरा आजही जपली जात आहे. यामध्ये दाजीबा वीर नवसाला पावणारा देव मानला जातो आणि तो सर्वांचे विघ्न दूर करतो, अशी नाशिककरांची श्रद्धा आहे.
जुने नाशिक परिसरातून हलगीच्या तालावर दाजीबा वीरांची जल्लोषात मिरवणूक काढली जाते. दाजीबा वीराचे दरवर्षी मानकरी ठरलेले असतात, या मानकरींना मानापानाचा पारंपरिक पोशाखाने सजविले जाते. ही वीर मिरवणूक परंपराही आजही प्रसिद्ध आहे. मिरवणुकीला सुरुवात होताच दाजीबा वीर नृत्य करत असतो. साधारणतः पाच ते सहा पिढ्यांची परंपरा असलेल्या दाजीबा वीराच्या मिरवणुकीत बाशिंगे वीर नाचवले जातात.