Nashik Cyber Fraud | 18 बँक खात्यांचा गैरवापर करून 26 लाखांची फसवणूक

Nashik Cyber Fraud | 18 बँक खात्यांचा गैरवापर करून २६ लाखांची फसवणूक; सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Pension Card Fraud
Pension Card FraudPudhari
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरासह देशातील विविध भागांतील नागरिकांची तब्बल २५ लाख ७९ हजार ४८७ रुपयांची सायबर फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pension Card Fraud
Morjim Illegal Constructions | मोरजीतील 23 बेकायदा बांधकामांवर 'बुल्डोझर', उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर प्रशासनाची धडक कारवाई

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ जानेवारी २०२५ ते आजपर्यंतच्या कालावधीत विविध बँकांमधील एकूण १८ बँक खात्यांचा वापर करून देशातील विविध भागांतील नागरिकांची वेगवेगळ्या बहाण्यांनी आर्थिक फसवणूक करण्यात आली.

फसवणुकीतून जमा झालेली २५ लाख ७९ हजार ४८७ रुपयांची रक्कम या खात्यांद्वारे फिरवण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. या व्यवहारांमध्ये सेंट्र्ल बँक ऑफ इंडिया, सिटी युनियन बँक आणि कॅनरा बँक यांसह विविध बँकांतील खात्यांचा वापर झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

प्रवीण मधुकर वेताळ (वय ५२) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुशीला कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. सायबर पोलिसांकडून संबंधित बँकांकडून व्यवहारांचा तपशील मागवण्यात आला असून, पैशांचा अंतिम लाभार्थी कोण आहे,

रक्कम कोणत्या खात्यात वळवण्यात आली आणि या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास सुरू आहे. तांत्रिक पुरावे, बँक व्यवहारांची माहिती आणि डिजिटल ट्रेलआधारे आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

Pension Card Fraud
Karnataka Tourist Suicide | कर्नाटकातील पर्यटकाची हॉटेलमध्ये आत्महत्या

आरोपींचा यापूर्वीचा गुन्हेगारी इतिहास अथवा अटकेबाबत अद्याप कोणतीही नोंद उपलब्ध नसल्याचे पोलिसांनी सांगितले. नागरिकांनी ऑनलाइन व्यवहार करताना सतर्क राहण्याची आवश्यकता असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुशीला कोल्हे यांनी सांगितले.

अनोळखी व्यक्तीकडून आलेले मेसेज, लिंक, क्यूआर कोड किंवा कॉलला प्रतिसाद देऊ नये. ओटीपी, बँक खाते, एटीएम कार्ड गोपनीय माहिती देऊ नये. फसवणूक झाल्यास १९३० या हेल्पलाइनवर संपर्क साधावा, असेही स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news