Nashik Cyber Crime | नाशिकमध्ये सायबर भामट्यांचा धुमाकूळ! दोन घटनांत नागरिकांना 64 लाखांचा गंडा

Nashik Cyber Crime | मनी लाँड्रिंगच्या नावाखाली अटकेची धमकी; नाशिकमध्ये 18 लाखांची ऑनलाइन फसवणूक
Nashik Cyber Crime
Nashik Cyber Crime
Published on: 
Updated on: 

देवळाली कॅम्प : पुढारी वृत्तसेवा

'एव्हिएशन विंग्ज' हा केवळ सन्मान नव्हे, तर देशाप्रती मोठ्या जबाबदारीचे प्रतीक आहे. आज संपूर्ण आर्मी एव्हिएशन परिवाराला तुमचा अभिमान वाटत आहे. या सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या पालकांचेही मी मनःपूर्वक आभार मानतो. तुम्ही आपल्या मुला-मुलींना देशसेवेसाठी घडविले. आजपासून ते केवळ तुमचेच नव्हे, तर राष्ट्राचेही आहेत, असे गौरवोद्गार आर्मी एव्हिएशनचे महासंचालक तथा कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नांबियार यांनी काढले.

Nashik Cyber Crime
Leopard Attack | देवळाली कॅम्प हादरले! संसरी गावात बिबट्याचा वावर; सीसीटीव्हीत कैद झाला पाळीव कुत्र्यावरील थरारक हल्ला

नाशिकरोड येथील कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलच्या पदवीदान संचलन सोहळ्यात नांबियार यांनी मार्गदर्शन केले. आजचा दिवस ऐतिहासिक आहे. आर्मी एव्हिएशनच्या पहिल्या यंग ऑफिसर्स कोर्समधील अधिकाऱ्यांनी प्रथमच प्रतिष्ठेचे एव्हिएशन विंग्ज प्राप्त केले आहेत. तुमच्यानंतर येणाऱ्या प्रत्येक तुकडीसाठी तुम्ही निश्चित केलेले मापदंड प्रेरणादायी ठरतील.

नव्याने पात्रता प्राप्त केलेल्या फ्लाइंग इन्स्ट्रक्टर्सवर भविष्यातील वैमानिक घडविण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे. त्यांच्या कौशल्यासोबतच सुरक्षिततेची संस्कृती विकसित करण्याचे कामही तुमच्यावर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

भविष्यातील युद्धभूमीवर हेलिकॉप्टर आणि मानवरहित विमान प्रणालींची भूमिका अधिक महत्त्वाची ठरणार आहे. ड्रोन आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित स्वयंचलित यंत्रणा युद्धाचे स्वरूप बदलतील.

ड्रोनमुळे कमांडर्सना युद्धभूमीवरील परिस्थितीची अचूक माहिती मिळेल. हेलिकॉप्टर सैनिकांची जलद वाहतूक, अतिरिक्त कुमक आणि रसदपुरवठा करतील, तर रुद्र आणि प्रचंडसारखी आक्रमक हेलिकॉप्टर युद्धभूमीवर निर्णायक कारवाई करण्यास मदत करतील, या मुद्द्यांवर त्यांनी आपल्या भाषणात भर दिला.

एका वर्षात १८ अभ्यासक्रम

२००३ मध्ये केवळ तीन प्रशिक्षण अभ्यासक्रमांसह सुरू झालेल्या कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलने आज एका वर्षात १८ अभ्यासक्रम राबविण्यापर्यंत प्रगती केली आहे. प्रगत लढाऊ प्रशिक्षणात मानवी आणि मानवरहित हवाई यंत्रणांच्या संयुक्त प्रशिक्षणाचा समावेश करण्यात आला आहे. व्हर्च्युअल रिॲलिटी आधारित सिम्युलेटरचा वापरही सुरू झाला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाधारित प्रशिक्षणामुळे भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता विकसित होत आहे.

Nashik Cyber Crime
Nashik Crime News: देवळाली कॅम्प हादरले; विड्याचे पान आणण्यावरून सुनेकडून आजारी सासूचा खून

... आमची क्षमता यामुळे स्पष्ट झाली

'ऑपरेशन सिंदूर' ने अचूक लक्ष्यभेदी हल्ले आणि हवाई संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. भविष्यातील युद्धांसाठी संयुक्त कार्यप्रणाली, एकात्मिक युद्धसंकल्पना आणि नव्या प्रशिक्षण पद्धतींचा स्वीकार करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करताना ते पुढे म्हणाले की, दक्षिण कमांडच्या कार्यक्षेत्रातील पूरस्थितीत आर्मी एव्हिएशनच्या पथकांनी तातडीने बचावकार्य करून अनेकांचे प्राण वाचविले. नागरी प्रशासन आणि अन्य सैन्यदलांशी समन्वय साधून देशसेवेचे कार्य करण्याची आमची क्षमता यामुळे स्पष्ट झाली आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.