Nashik Murder | त्या महिलेचा खूनच ; पतीचा शोध सुरूच

फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
Nashik Murder
त्या महिलेचा खूनच ; पतीचा शोध सुरूचpudhari photo
Published on
Updated on

नाशिक : पाथर्डी शिवारातील सदाशिवनगर येथील कृष्णा प्राइड अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये गुरुवारी (दि.२९) दुपारी संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळलेल्या निशा मयूर नागरे (३३) यांचा खून झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यानुसार इंदिरानगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून निशाचा पती मयूर नागरे याचा शोध सुरू केला आहे.

Nashik Murder
Nashik Crime | सदाशिवनगरला फ्लॅटमध्ये आढळला महिलेचा मृतदेह, पती बेपत्ता

निशा ही मुंबईतील हॉटेलमध्ये कामास होती. तर तिचा पती मयूर नागरे याचे कोणार्कनगर येथे हॉटेल असल्याचे घरमालकांनी सांगितले होते. गुरुवारी दुपारी १२.३० च्या सुमारास घरकाम करणाऱ्या संगीता खिल्लारे या नागरे यांच्या घरी गेल्या. बाहेरून कुलूप असल्याने त्यांनी त्यांच्याकडील चावीने घर उघडले. त्यावेळी घरातील बेडवर निशा निपचित पडलेल्या आढळून आल्या. त्यामुळे इमारतीतील इतर नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. घटनेनंतर निशासोबत राहणारा मयूर नागरे फरार असल्याचे आढळून आले. शुक्रवारी (दि.३०) सकाळी फॉरेन्सिक पथकाच्या उपस्थितीत शवविच्छेदन केले असता निशाच्या मानेवर व अन्य ठिकाणी इजा असल्याचे समोर आले. निशाचा गळा आवळल्याने श्वास गुदमरून मृत्यू झाल्याचा अहवाल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला. त्यानुसार पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून, संशयित मयूरचा शोध घेतला जात आहे. मयूरच्या अटकेनंतरच खुनाचा उलगडा होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news