Nashik Crime News | सचिव अरुण काळे यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी

Arun Kale: नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती बाजार वसुली अपहार प्रकरण; पोलिस कोठडी
Nashik Market Committee
अपहारप्रकरणी कृउबा'चे माजी सचिव अरुण काळेंना अटकfile photo
Published on
Updated on

पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत बनावट पावती पुस्तक छापून फसवणूक करून ९० लाखांच्या अपहारप्रकरणी अटक करण्यात आलेला तत्कालीन सचिव अरुण काळे यांना बुधवारी पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता त्यांना सोमवार (दि ५) ऑगस्टपर्यंत पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. (Arun Kale cheated by tampering with the receipt books.)

याबाबत अधिक माहिती अशी की, संशयित लिपिक (प्रतवारी कर) सुनील जाधव बाजार समितीत १ डिसेंबर २०२१ ते २४ मे २०२२ पर्यंत नियुक्त होता. या दरम्यान काही पावती पुस्तेक संशयित जाधव यांना देण्यात आली होती. मात्र, जाधवने याच क्रमांकांचे बनावट पावती पुस्तक बनवून बाजार फी वसुली केली. तसेच पावती पुस्तक क्रमांक ३०९ दिले नसताना त्या माध्यमातुन बाजार फीची वसुली केली. बाजार समितीच्या एकुण १२ पावती पुस्तकांचा गैरवापर करून पावती पुस्तकांमध्ये खाडाखोड करून ८९ लाख ७७ हजार रुपयांचा अपहार केला. याप्रकरणी नाशिक बाजार समिती सचिव प्रकाश घोलप यांनी सुनील जाधवविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

Nashik Market Committee
Nashik News | अपहारप्रकरणी कृउबा'चे माजी सचिव अरुण काळेंना अटक

संशयित सुनील जाधव यांनी प्रथम नाशिक न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला मात्र, तो न्यायालयाने फेटाळला होता. त्यावेळी जाधवने उच्च न्यायालयात धाव घेतली. या प्रक्रियेत उच्च न्यायालयाने काही निरीक्षण नोंदविले. यात दोन वर्षांनी गुन्हा का नोंदविण्यात आला, असा प्रश्न विचारला. या गुन्ह्यात तत्कालीन सचिव संशयित अरूण काळे यांनी पोलिसांना तपास कामात सहकार्य केल नाही. तसेच न्यायालयात तारखेस गैरहजर राहणे, न्यायालयाने मागितलेले कागदपत्र सादर न करणे, वेळोवेळी आदेश देऊन देखील त्याचे पालन न करणे या कारणांमुळे न्यायालयाच्या आदेशानुसार मंगळवार (दि.३०) सायंकाळी तत्कालीन सचिव अरूण काळे यांना ताब्यात घेतले होते.

काळे यांच्या खुलाशाकडे अनेकांचे लक्ष

अरुण काळे या प्रकरणात काय काय खुलासे करतात याकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत. अपहार प्रकरणात इतर कोणी कर्मचारी सहभागी आहेत की अजून कोणी याबाबत काळे यांच्याकडून काय काय माहिती मिळते हेही बघणे महत्वाचे आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news