Nashik Crime News | वेळुंजे गावात जमावाची दहशत, काका-पुतण्यावर प्राणघातक हल्ला

Nashik Crime News | वेळुंजे गावात जमावाची दहशत, काका-पुतण्यावर प्राणघातक हल्ला

नाशिक : वेळुंजे (ता. त्र्यंबकेश्वर) गावात जमावाने काका पुतण्यावर हल्ला करीत पुतण्यास जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच जमावाने गावातील दुकानावर दगडफेक केल्याची घटना मंगळवारी (दि.२६) सायंकाळी ६ ते ७ च्या सुमारास घडली. या प्रकरणी भावडू बोडके (४०, रा. वेळुंजे) यांच्या फिर्यादीनुसार त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्यात जमावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बोडके यांच्या फिर्यादीनुसार, ते मंगळवारी सायंकाळी त्यांच्या पुतण्यासोबत जात होते. त्यावेळी जमावाने बोडके यांचे वाहन अडवून 'तुम्ही आमच्यासोबत चुकीचे का बोलले' अशी कुरापत काढून मारहाण करण्यास सुरुवात केली. जमावातील संशयित गोपाळ उघडे (२७), शंकर पाडेकर व संतोष बांगारे यांनी भावडू यांच्या पुतण्याचा गळा आवळून रॉड व फायटरने मारहाण करीत डोक्यास गंभीर दुखापत केली. तर संशयित नंदू उघडे व बाळू उघडे यांच्यासह इतर १० ते १२ जणांनी गावातीलच सचिन बोडके व केशव बोडके यांना मारहाण केली. तसेच शंकर बोडके यांच्या दुकानावर दगडफेक करीत नुकसान केले. संशयितांनी गावात दहशत करण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच पेठ उपविभागीय अधिकारी नितीनकुमार गोकावे, त्र्यंबकेश्वरचे पोलिस निरीक्षक बिपीन शेवाळे यांच्या पथकाने परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी जमावातील काही संशयितांची धरपकड केली आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news