

नाशिकरोड: येथील पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने एमडी ड्रग्स प्रकरणातील दोन तस्करांना केलेल्या अटकेप्रकरणी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पथकाचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार केला.
पथकाने गत सत्पाहात राहुल सोनवणे आणि त्याचा साथीदार केतन पोहले यांना २९ ग्रॅम एमडीसह पकडत अंमली पदाथ विक्रीचा डाव उधळला. या कारवाईतील सहभागी गुन्हे शोधपथक अधिकारी संदीप पवार, विजय टेमघर, अविनाश देवरे, नितीन भामरे, नाना पानसरे, अजय देशमुख, समाधान वाजे, विशाल कुवर या पोलिस कर्मचाऱ्यांना पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी या प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला. यावेळी उपायुक्त किशोर काळे, एसीपी सचिन बारी, नाशिकरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे उपस्थित होते.