Nashik Crime | अंबडला बारा लाखांचा गुटखा जप्त, दोघांना अटक

Nashik Crime | अंबडला बारा लाखांचा गुटखा जप्त, दोघांना अटक
Published on
Updated on

सिडको : पुढारी वृत्तसेवा- प्रतिबंधित तंबाखू विक्रीला बंदी असताना अंबड गरवारे पॉईंट येथे एमआयडीसी पोलिसांनी एका ट्रकमधून तब्बल १५ लाखांचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

सिडको : जप्त करण्यात आलेले तंबाखूजन्य पदार्थ. समवेत पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे व अधिकारी व कर्मचारी
सिडको : जप्त करण्यात आलेले तंबाखूजन्य पदार्थ. समवेत पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे व अधिकारी व कर्मचारी

महामार्गावरून मुंबईला तंबाखू तसेच गुटखा घेऊन एक ट्रक जात असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने गरवारे पॉईंट येथे बुधवारी पहाटे सापळा रचत आयशर ट्रक (सीजी ०४ एन डब्ल्यू ९०७६) येथे पकडला. या ट्रकची तपासणी केली असता त्यात पोलिसांना तंबाखू आणि गुटख्याचे १८० बॉक्स आढळले. या मालाची किंमत पंधरा लाख रुपये आहे. पोलिसांनी चालक सिताराम मकवाणी (वय ४६) व बबलू मकवाणी (वय १९) यांना अटक केली. अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी पी. एस. पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा –

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news