Nashik BSNL Cable Theft Case | दहा कोटींची केबल चोरणारे ताब्यात

Nashik BSNL Cable Theft Case | आंतरराज्यीय टोळी; कॉपर व अॅल्युमिनियम यूजी केबलवर डल्ला
Digital Arrest Scam
Digital Arrest ScamPudhari
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक शहर पोलिस आयुक्तालयाच्या गुन्हेशाखा युनिट क्रमांक एकने दोन दिवसांपूर्वी भूमिगत केबल चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला जेरबंद केले होते. या प्रकरणाच्या तपासात धक्कादायक माहिती समोर येत असून, आरोपींनी केवळ नाशिकच नव्हे, तर इतर भागांतही मोठ्या प्रमाणावर भूमिगत कॉपर व अॅल्युमिनियम यूजी केबलची चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे.

Digital Arrest Scam
Ashok Kharat Case: भोंदूबाबा प्रकरणात मोठा खुलासा; ‘शिवानिका’ला पाणी देण्याच्या आदेशाची चौकशी

प्राथमिक तपासात जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत २ कोटी ८८ लाख ४० हजार रुपये असली तरी, चोरीची एकूण व्याप्ती १० कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस उपायुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण आणि सहायक पोलिस आयुक्त (गुन्हेशाखा) संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल, गुंडा पथक आणि अंबड गुन्हे शाखेने ही मोठी कारवाई उघडकीस आणली आहे.

नाशिक शहरातील बीएसएनएलच्या भूमिगत कॉपर व अॅल्युमिनियम यूजी केबल चोरीच्या वाढत्या घटनांचा तपास करत असताना गुन्हेशाखा युनिट १, गुंडा पथक आणि अंबड गुन्हेशाखेने संयुक्त कारवाई करून या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला. या प्रकरणात पोलिसांनी वाहब अब्दुल नवाज (३५), सुरेश दिलीप वैराळ (३७, दोघे रा. भांडुप, मुंबई), बसंतलाल राजाराम यादव (३८, अशोकनगर, चेंबूर पूर्व, मुंबई), कमलेश कुमार सुखदेव रविदास (२६, बिहार), तनवीर मुफसीर शेख (३१, भांडुप, मुंबई) आणि राजकुमार केशुलाल जैन (५०, भांडुप पश्चिम, मुंबई) यांना अटक केली आहे.

Digital Arrest Scam
DG Insignia Award: पोलिस आयुक्तालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा

नाशिकरोड ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपींकडून महत्त्वाची माहिती समोर आली. अधिक चौकशीत चोरीचा माल राजकुमार जैन यांच्या भांडुप येथील गोदामात साठवून ठेवण्यात आल्याचे निष्पन्न झाल्यानंतर गुन्हेशाखेच्या पथकाने तेथे छापा टाकला. या कारवाईत १७.५ टन विविध रंगांच्या अॅल्युमिनियम केबल वायर, १४.५ टन जेलीफिल्ड वायरमधून वेगळे करण्यात आलेले कॉपर आणि १.५ टन विविध प्रकारच्या केबल वायरचे तुकडे असा एकूण २ कोटी ८८ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मात्र, त्यानंतरच्या चौकशीत आरोपींनी अनेक ठिकाणी अशाच प्रकारच्या चोऱ्या केल्याचे समोर आले असून, चोरीच्या मालाची एकूण किंमत १० कोटी रुपयांहून अधिक असण्याची शक्यता

शहरातील पाच गुन्ह्यांची उकल

तपासादरम्यान आरोपींकडून नाशिक शहरातील आणखी पाच गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यामध्ये सरकारवाडा ठाणे, मुंबई नाका ठाणे इंदिरानगर पोलिस ठाण्यातील दोन गुन्हे, तर म्हसरूळ पोलिस ठाणे येथे दाखल गुन्ह्यांचा समावेश आहे. या टोळीने नाशिक शहरातील विविध भागांमध्ये केबल चोरी करून शासकीय व दूरसंचार यंत्रणांचे मोठे आर्थिक नुकसान केल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news