Nashik WhatsApp Hacking | व्हॉट्सअॅपवर 'पैसे पाठवा' मेसेजपासून सावधान

Nashik WhatsApp Hacking | सायबर भामट्यांकडून फोन हॅकिंगचा नवा फंडा
Whatsapp Hack
Whatsapp Hack Pudhari Photo
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांची फसवणूक करण्यासाठी दिवसेंदिवस नव्या युक्त्या वापरल्या जात आहेत. आता व्हॉट्सअॅप हॅकिंगच्या माध्यमातून आर्थिक फसवणुकीचा नवा प्रकार वेगाने वाढत आहे. आपल्या परिचित व्यक्तीच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावरून अचानक 'मला तातडीने पैशांची गरज आहे, कृपया लगेच पैसे पाठवा', असा संदेश येतो.

Whatsapp Hack
Nashik Petrol Pump Cyber Fraud | डिजिटल चोरांचा आता नवा फंडा; फ्रॉडची रक्कम पेट्रोलपंपांच्या खात्यात

संबंधित व्यक्ती अडचणीत असल्याचे भासवून नागरिकांची सहानुभूती मिळवली जाते आणि त्यानंतर काही मिनिटांतच आर्थिक फसवणूक केली जाते. सायबर तज्ज्ञांच्या माहितीनुसार, गुन्हेगार प्रथम एखाद्या व्यक्तीचे व्हॉट्सअॅप खाते हॅक करतात किंवा त्याचा ताबा मिळवतात. त्यानंतर त्या व्यक्तीच्या संपर्क यादीतील मित्र, नातेवाईक, सहकारी आणि व्यावसायिक संपर्काना मदतीचे संदेश पाठवले जातात.

अनेकदा रुग्णालयातील उपचार, अपघात, तातडीचे बिल किंवा कौटुंबिक अडचणीचे कारण सांगून पैसे मागितले जातात. त्यामुळे मेसेज प्राप्त करणारी व्यक्ती भावनिकदृष्ट्या प्रभावित होते. अनेकवेळा संदेश मिळाल्यानंतर खातरजमा करण्यासाठी संबंधित व्यक्तीला फोन लावला जातो. मात्र त्यांचा मोबाइल क्रमांक बंद, स्विच ऑफ किंवा नेटवर्क क्षेत्राबाहेर असल्याचे दिसून येते.

Whatsapp Hack
Nashik Petrol Pump Cyber Fraud | डिजिटल चोरांचा आता नवा फंडा; फ्रॉडची रक्कम पेट्रोलपंपांच्या खात्यात

त्यामुळे खरोखरच काही आपत्तिजनक परिस्थिती निर्माण झाली असावी, अशी भावना निर्माण होते. याच मानसिकतेचा फायदा घेत भामटे नागरिकांकडून तातडीने ऑनलाइन व्यवहार करून घेतात. विशेष म्हणजे, अशा संदेशांमध्ये संबंधित व्यक्तीचे नाव, छायाचित्र आणि वैयक्तिक माहिती असल्यामुळे तो संदेश खरा असल्याचा भास होतो.

Summary

..अशी घ्या खबरदारी

  1. व्हॉट्सअॅपवर पैसे मागणाऱ्या संदेशावर लगेच विश्वास ठेवू नका.

  2. संबंधित व्यक्तीशी दुसऱ्या क्रमांकावरून संपर्क साधा.

  3. फोन बंद असल्यास आर्थिक व्यवहार टाळा.

  4. नवीन यूपीआय आयडी किंवा बँक खात्यावर पैसे पाठवण्यापूर्वी खातरजमा करा.

  5. व्हॉट्सअॅपवर टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन सुरू ठेवा.

  6. ओटीपी, पासवर्ड किंवा वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका.

  7. कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करणे टाळा.

  8. फसवणूक झाल्यास सायबर हेल्पलाइन १९३० वर संपर्क साधा.

  9. जवळच्या सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करा.

सायबर सुरक्षेबाबत जागरूकता हाच अशा फसवणुकीपासून बचावाचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. याबाबत नागरिकांनी सतर्क राहावे. संशयास्पद संदेश, लिंक किंवा पैशाची मागणी आल्यास पडताळणी करावी. फसवणूक झाल्यास तत्काळ सायबर पोलिस ठाण्याशी संपर्क करावा.

- संदीप कर्णिक, पोलिस आयुक्त, नाशिक शहर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news