Nashik TCS Case Nida Khan Bail | निदा खान, तौसिफ अत्तारला जामीन; दानिशचा अर्ज फेटाळला

Nashik TCS Case Nida Khan Bail | टीसीएस प्रकरण : नाशिकरोड न्यायालयाचा निर्णय
nida khan
TCS Nashik case Nida Khanpudhari photo
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्यभर चर्चेत असलेल्या टीसीएस आयटी कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांच्या कथित लैंगिक शोषण व जबरदस्तीने धर्मांतर प्रकरणात मुख्य संशयित आरोपी निदा खान आणि तौसिफ अत्तार यांना नाशिकरोड न्यायालयाने सोमवारी (दि. ६) जामीन मंजूर केला. नाशिकरोड न्यायालयाचे न्यायाधीश केदार जोशी यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. निदा खानच्या वतीने अॅड. राहुल कासलीवाल, अॅड. बाबा सय्यद मांडली.

nida khan
Nasrapur Child Murder Case: नसरापूर प्रकरणात आरोपी दोषी; 29 जूनला न्यायालयाचा अंतिम निर्णय, आज कोर्टात काय घडलं?

तसेच त्यांचे सहकारी अॅड. प्रतीक पाटील यांनी बाजू याच प्रकरणाशी संबंधित देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या कथित बलात्काराच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी दानिश शेख याचा जामीन अर्ज मात्र न्यायालयाने फेटाळून लावला. त्यामुळे या गुन्ह्यात त्याची न्यायालयीन कोठडी कायम राहणार आहे. निदा खानने यापूर्वी स्वतः गर्भवती असल्याचे कारण देत जामिनासाठी अर्ज केला होता.

मात्र, तो अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर पुन्हा नव्याने दाखल करण्यात आलेल्या अर्जावर सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने तिला जामीन मंजूर केला. टीसीएस प्रकरण उघडकीस आल्यानंतर निदा खान काही काळ फरार होती. विशेष तपास पथकाने छत्रपती संभाजीनगर येथील नरेगाव परिसरातून तिला अटक केली होती.

nida khan
TCS Nashik |पीडितेच्या ब्रेनवॉशसाठी झाकिर नाईकचे व्हिडिओ

या प्रकरणात तिला आश्रय दिल्याचा संशय व्यक्त होत असल्याने एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांची विशेष तपास पथकाचे प्रमुख तथा सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांच्या पथकाने नाशिक पोलिस आयुक्तालयात चार वेळा चौकशी केली होती. टीसीएस आयटी कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचे कथित लैंगिक शोषण व जबरदस्तीने धर्मांतर प्रकरणात गेल्या दोन महिन्यांपासून सहा संशयित आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत.

या आरोपींमध्ये टीसीएस कंपनीच्या एचआर विभागाच्या प्रमुख अश्विनी चेन यांचाही समावेश आहे. राज्यभर गाजलेल्या या प्रकरणातील जामीन अर्जावरील निर्णयामुळे तपासाच्या पुढील प्रक्रियेकडे आणि न्यायालयीन सुनावणीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news