Nashik College Student killed Panchavati|पंचवटीतील टकलेनगरमध्ये महाविद्यालयीन युवकाची हत्या

Nashik College Student killed Panchavati- मुलीवरून झालेल्या वादातून हल्ल्याचा संशय
Nashik College Student killed Panchavati
वेदांत संतोष काळे
Published on: 
Updated on: 

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा

टकलेनगर परिसरात जुन्या भांडणाच्या कारणावरून तीन दुचाकीवरून आलेल्या टोळक्याने वेदांत संतोष काळे (१८, रा. खैरे गल्ली, गाडगे महाराज धर्मशाळेजवळ) याच्यावर धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची घटना शुक्रवारी (दि. २०) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या हल्ल्यात त्याच्यासोबत असलेला मित्रही मारहाणीत जखमी झाला आहे. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुक्रवारी मध्यरात्री सव्वादोनच्या टकलेनगर येथील जिजामाता महिला व्यायामशाळेच्या आवारातील पायऱ्यांवर वेदांत काळे हा मित्र भारत कुंदेसमवेत बसला होता. यावेळी पीयूष लोखंडे व त्याच्यासोबत इतर संशयित तीन दुचाकीवरून आले. संशयितांनी वेदांतला उद्देशून मोठ्याने आरडाओरड करत धमकावले. जुन्या भांडणाचा राग मनात धरत त्यांनी शस्त्राने वेदांतवर वार केले. यात त्याला गंभीर दुखापत झाली.

यावेळी फिर्यादी व त्याचा मित्र भारत कुंदे यांनाही मारहाण करण्यात आली. त्यानंतर संशयित दुचाकीवरून पसार झाले. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या वेदांतचा मृत्यू झाला. याबाबत निशांत काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पीयूष लोखंडे, गणेश रेणुके, अमोल माळोदे, पीयूष लोट, यश आव्हाड, दीपक पाचोरे, दादू, ठोंबरे व इतर मुलांविरोधात पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nashik College Student killed Panchavati
Nashik Trimbakeshwar Road Traffic Diversion| नाशिक - त्र्यंबकेश्वर मार्गात चार दिवसांसाठी बदल

गंभीर जखमी वेदांतला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथे पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक पोलिस आयुक्त शेखर देशमुख, पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील आणि पोलिस निरीक्षक सुनील पवार यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. याबाबत पोलिस उपनिरीक्षक सुधीर पाटील तापस करत आहेत. या हत्येप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील पाच संशयितांना अटक करण्यात आली.

Nashik College Student killed Panchavati
PM Awas Yojana | नाशिक जिल्ह्याची राज्यात मोठी झेप! प्रधानमंत्री आवास योजनेत चौथा क्रमांक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.