Nashik Citilinc Refund | सिटीलिंककडून प्रवाशांना 26 हजारांचा परतावा

Nashik Citilinc Refund | नाशिक महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड कंपनी अर्थात सिटीलिंकने प्रवासीहित जपत गेल्या तीन महिन्यांत ५४ प्रवाशांना तब्बल २६ हजार ८५७ रुपयांचा परतावा दिला आहे.
Nashik Citilinc Lucky Draw 2026
Nashik Citilinc Lucky Draw 2026
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड कंपनी अर्थात सिटीलिंकने प्रवासीहित जपत गेल्या तीन महिन्यांत ५४ प्रवाशांना तब्बल २६ हजार ८५७ रुपयांचा परतावा दिला आहे. प्रवासादरम्यान उद्भवणाऱ्या तांत्रिक अडचणींवर तत्परतेने कार्यवाही करत सिटीलिंकने प्रवाशांचा विश्वास अधिक दृढ केला आहे.

Nashik Citilinc Lucky Draw 2026
Nashik Tree Census 2026 | नाशिकच्या निसर्गसंपदेत वाढ! शहरातील वृक्षांची संख्या 50 लाखांच्या पार; मनपाची नवी गणना अंतिम टप्प्यात

दररोज हजारो प्रवासी सिटीलिंकच्या बससेवेचा लाभ घेत असताना काही वेळा ऑनलाइन तिकीट किंवा पास जनरेट न होणे, बसफेरी रद्द होणे, बँक खात्यातून रक्कम वजा होऊन तिकीट न मिळणे तसेच गर्दीमुळे वाहकाकडून उर्वरित रक्कम तत्काळ परत न मिळणे अशा किरकोळ समस्या निर्माण होतात.

मात्र, अशा प्रत्येक तक्रारीची गांभीयनि दखल घेत संबंधित प्रवाशांना योग्य परतावा देण्यासाठी सिटीलिंक प्रशासनाने प्रभावी यंत्रणा कार्यान्वित ठेवली आहे. जानेवारी ते मार्च २०२६ या कालावधीत जानेवारी महिन्यात १४ प्रवाशांना ७ हजार ७२८ रुपये, फेब्रुवारी महिन्यात २४ प्रवाशांना १४ हजार ८२ रुपये तर मार्च महिन्यात १६ प्रवाशांना ५ हजार ४७ रुपयांचा परतावा करण्यात आला.

सिटीलिंकच्या पारदर्शक आणि प्रवाशीकेंद्रित भूमिकेमुळे संबंधित प्रवाशांनी समाधान व्यक्त करत प्रशासनाचे आभार मानले आहेत. भविष्यातही उत्कृष्ट आणि विश्वासार्ह सेवा देण्यासाठी सिटीलिंक कटिबद्ध राहील, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news