Cidco Residential Area Power Lines | सिडकोवासीयांच्या डोक्यावर उघड्या वीजतारांचे संकट

Cidco Residential Area Power Lines | अनेक कॉलनीत भूमिगत वीजवाहिन्यांची गरज
Electric Shock
Electric ShockPudhari
Published on
Updated on

सिडको : पुढारी वृत्तसेवा

सिडको परिसरातील अनेक भागांमध्ये अद्यापही उघड्या वीजतारा घरांच्या छतांवरून व निवासी वस्त्यांमधून जात असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पूर्वी अशा वीजतारांमुळे अनेक दुर्घटना घडल्या असून, भविष्यात मोठी जीवितहानी टाळण्यासाठी उर्वरित भागातील वीजवाहिन्या तातडीने भूमिगत करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Electric Shock
Jaykumar Rawal | नवीन वीज उपकेंद्रामुळे बळसाणे परिसराच्या विकासाला चालना मिळणार : पालकमंत्री जयकुमार रावल

सिडकोत वीजतारांचा शॉक लागून आतापर्यंत ८ ते १० जणांचा मृत्यू झाला आहे. खोडे मळा परिसरातील वृंदावननगर, महाराणा प्रताप चौक, पवननगर, हेडगेवारनगर तसेच लगतच्या वसाहतींमध्ये वीजतारा घरांच्या अगदी जवळून गेल्या आहेत.

वाढती लोकसंख्या, घरांचे वाढलेले मजले आणि अरुंद जागेमुळे धोका वाढला आहे. जुने सिडको परिसरात घराच्या पहिल्या मजल्यावर कपडे वाळत टाकताना एका महिलेचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. तसेच जुने सिडको, विजयनगर, सावतानगर आदी भागांमध्ये पतंग उडविताना घरांवरील वीजतारांचा संपर्क आल्याने अनेक शाळकरी मुलांचे बळी गेले आहेत. उत्तमनगर परिसरात एका घरातील तीन महिलांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला

खोडे मळा परिसरातील वृंदावन कॉलनी भागात काही ठिकाणी उघड्या विजेच्या तारांमुळे भविष्यात मोठी दुर्घटना होण्यापूर्वी वीजतारा भूमिगत केल्या पाहिजे.

प्रकाश ओगले, सामाजिक कार्यकर्ते, वृंदावन कॉलनी

सध्या सिंहस्थाची विकासकामे सुरू आहेत त्या निधीतून तारा भूमिगत कराव्यात.

- योगेश गांगुर्डे, सामाजिक कार्यकर्ते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news