Chandwad Tehsil Office | 'गौण खनिज'चा ‘मलईदार’ टेबल सुटेना; चांदवड तहसील कार्यालयात संबंधिताला चार्ज मिळेना

फेब्रुवारी २०२६ मध्ये महसूल विभागातील काही कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये बदल
Chandwad Tehsil Office
Chandwad Tehsil Office AI image
Published on
Updated on

Chandwad Tehsil Office Charge Handover Issue

चांदवड : चांदवड तहसील कार्यालयातील गौण खनिज विभागाच्या टेबलवरून पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. तहसीलदार अनिल चव्हाण यांनी फेब्रुवारी २०२६ मध्ये महसूल विभागातील काही कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये बदल केले होते. मात्र, गौण खनिज विभागाचा चार्ज अद्यापही संबंधित कर्मचाऱ्याकडून नवीन अधिकाऱ्याकडे सुपूर्त करण्यात आलेला नसल्याने तहसील कार्यालयात दबक्या आवाजात चर्चांना जोर चढला आहे.

महसूल विभागातील पुरवठा व गौण खनिज ही खाती ‘मलईदार’ मानली जात असल्याने या विभागांवर काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांमध्ये विशेष रस असल्याचे बोलले जाते. विभागातील काही तक्रारींच्या पार्श्वभूमीवर तहसीलदारांनी खातेबदलाचा निर्णय घेतला होता. त्यानुसार गौण खनिज विभागाची जबाबदारी सागर खरोटे यांच्याकडून काढून माजी सैनिक खंडेराव शिंदे यांच्याकडे देण्यात आली होती. तर सागर खरोटे यांच्याकडे ग्रामपंचायत विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली.

Chandwad Tehsil Office
Nashik fake godman: नाशिकच्या भोंदू बाबाकडून लऊळच्या तरुणांची फसवणूक

मात्र, खातेबदलानंतरही गौण खनिज विभागाचा प्रत्यक्ष चार्ज देण्यात आलेला नसल्याची चर्चा आहे. खातेबदलाच्या निर्णयानंतर संबंधित कर्मचारी आजारी पडला होता. त्यानंतर कामावर रुजू झाल्यावर मार्च महिन्याच्या उर्वरित खर्चाचे कारण पुढे करत गौण खनिज विभागाचा ताबा अद्याप सोडण्यात आलेला नाही, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

दरम्यान, खातेबदल होऊन तब्बल चार महिने उलटून गेले असतानाही अद्याप चार्ज हस्तांतराची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने तहसील कार्यालयात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गौण खनिज विभागाबाबत संबंधित कर्मचाऱ्यांची मोठी दहशत असल्याची चर्चा देखील दबक्या आवाजात सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news