Nashik fake godman: नाशिकच्या भोंदू बाबाकडून लऊळच्या तरुणांची फसवणूक

स्मशानभूमीत अघोरी पूजा, पशुबळी आणि दीड लाखाची आर्थिक फसवणूक
Nashik fake godman
Nashik fake godmanPudhari
Published on
Updated on

लऊळ : येथील दोन तरुणांना नाशिकच्या भोंदूबाबाने स्मशानभूमीत अघोरी पूजा, पशुबळी आणि दोन एकर जमीन हडपून दीड लाखाची आर्थिक फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.

याबाबत मदन नवनाथ देवकर (वय 26, रा. लऊळ ता. माढा) याने इंदिरानगर पोलिस स्टेशन नाशिक येथे फिर्याद दाखल केली आहे. त्यावरून भोंदूबाबा कमलेश महाराज ऊर्फ शिवकुमार अधिकारी व त्याची पत्नी गौरी अधिकारी या दोघांविरुद्ध नाशिक पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. अखिल भारतील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रयत्नानंतर हा गुन्हा उघडकीस आला आहे.

लऊळ (ता. माढा) येथील फिर्यादी मदन देवकर व त्याचा भाऊ ज्ञानेश्वर देवकर हे स्वतः च्या मालकीची 6 एकर शेती कसून उदरनिर्वाह करतात. त्यांच्या आई-वडिलांच्या अकाली निधनाने फिर्यादीच्या मनात बरेचसे प्रश्न निर्माण झाल्याने एका व्हायरल व्हिडिओचा आधार घेत भोंदूबाबाचा संपर्क झाला. दोठांना नाशिक येथे बोलावून ‌‘तुझा मृत्यूयोग सुरु असून तू खूप संकटात आहेस‌’ तुझ्या जमिनीबाबत व कुटुंबाबाबत तांत्रिक क्रिया करण्यात आल्या आहेत. असे सांगितले. अघोरी पूजा करावी लागेल त्यासाठी दीड लाख रूपयांचा खर्च येईल असे सांगितले.

फिर्यादी व त्याच्या भावाला भोंदू कमलेश याने उज्जैन येथे पूजा करण्यासाठी बोलावून घेतले व पूजेसाठी म्हणून दीड लाख रुपये ऑनलाईन पाठवण्यास सांगितले. त्यावेळी फिर्यादीने 90 हजार फोनपे द्वारे पाठविले व 60 हजार रोखीने दिले. त्यानंतर उज्जैन येथील स्म्शानभूमित चित्त अग्नीवर चारदिवस पूजा केली.

यादरम्यान होमहवन करुन बकऱ्याचे रक्त,कलेजा, मटनाचे तुकडे त्यात दिले जायचे व प्रसाद म्हणून फिर्यादीला भांग दिला गेला. दोष व शारीरिक बाधा दूर होतील असे सांगण्यात आले. मदन देवकर याच्या फिर्यादीवरुन भोंदूबाबा कमलेश महाराज उर्फ शिवकुमार अधिकारी व त्याची पत्नी गौरी कमलेश अधिकारी व इतरांवर गुन्हा दाखल झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news