Nashik Chandwad Election News : चांदवड नगरपरिषदेवर भाजपाचे 'कमळ' फुलले

नगराध्यक्षपदी भाजपाचे वैभव बागुल विजयी
चांदवड (नाशिक)
चांदवड : नगराध्यक्षपदी भाजपचे वैभव बागुल निवडून आल्यानंतर आनंदोत्सव साजरा करताना माजी आमदार शिरीष कोतवाल, भूषण कासलीवाल, मनोज शिंदे, योगेश ढोमसे, राहुल कोतवाल, लीलाबाई कोतवाल (छाया : सुनील थोरे)
Published on
Updated on

चांदवड (नाशिक) : सुनील थोरे

चांदवड नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार वैभव विजय बागुल यांनी ६९२५ मते मिळवत विजय मिळवला. त्यांनी अपक्ष उमेदवार राजेश अहिरे (४६२२) यांचा २३०३ मतांनी पराभव करत नगरपरिषदेवर 'कमळ' फुलवले. १० प्रभागांतील २० नगरसेवकांच्या निवडणुकीत भाजपला ११ जागांवर यश मिळाले. अपक्ष ५, शिवसेना शिंदे गट २, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट १ आणि शिवसेना उबाठा १ असे पक्षीय बलाबल राहिले. विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. प्रशासकीय इमारतीत रविवारी (दि.21 डिसेंबर) सकाळी १० वाजता मतमोजणीस प्रारंभ झाला. सुरुवातीस प्रभाग १ ते ५ व नंतर ६ ते १० अशी मतमोजणी करण्यात आली.

  • प्रभाग १ अ मधून भाजपच्या प्रियंका राऊत यांनी ६०१ मते घेत माकपच्या प्रियंका राऊत (४०८) यांचा १९३ मतांनी पराभव केला.

    प्रभाग १ ब मधून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे सुधीर कबाडे यांनी ५५१ मते घेत भाजपचे तुषार वाघ (४७५) यांचा ७६ मतांनी पराभव केला.

चांदवड (नाशिक)
Nashik Shinde Sena Victory : नाशिक जिल्हा शिंदे शिवसेनेचा बालेकिल्ला
  • प्रभाग २ अ मधून अपक्ष मंगल मोरे यांनी ७८१ मते घेत शिंदे गटाच्या सुनीता चव्हाण (५७१) यांचा २१० मतांनी पराभव केला.

    प्रभाग २ ब मध्ये अपक्ष राजू बागवान यांनी ७२० मते घेत भाजपचे किशोर क्षत्रिय यांचा पराभव केला. प्रभाग ३ अ मधून अपक्ष प्रसाद सोनवणे यांनी ६३५ मते घेत राष्ट्रवादीचे अल्ताफ तांबोळी (३५३) यांचा पराभव केला.

  • प्रभाग ३ ब मधून अपक्ष नयना वाघ यांनी ४५३ मते घेत भाजपच्या जयेदा पठाण (३१२) यांचा पराभव केला.

  • प्रभाग ४ अ मधून शिंदे गटाच्या पल्लवी मोरे यांनी ७७९ मते घेत अपक्ष विमलबाई माळी (२९८) यांचा पराभव केला.

    प्रभाग ४ ब मधून शिवसेना शिंदे गटाचे संदीप उगले यांनी ९०६ मते घेत अपक्ष सुशील पलोड (४५९) यांचा पराभव केला.

  • प्रभाग ५ अ मधून भाजपच्या मनीषा भालेराव यांनी ६८१ मते घेत अपक्ष पुष्पा बिरार (३२२) यांचा पराभव केला.

    प्रभाग ५ ब मधून भाजपचे भूषण कासलीवाल यांनी ८७९ मते घेत अपक्ष प्रशांत वैद्य (१४५) यांचा पराभव केला.

चांदवड (नाशिक)
Nashik Bhagur Election News : भगूरला 25 वर्षानंतर परिवर्तन
  • प्रभाग ६ अ मधून भाजपचे डॉ. जीवन देशमुख यांनी ९१२ मते घेत अपक्ष देविदास शेलार (५०४) यांचा पराभव केला.

    प्रभाग ६ ब मधून शिवसेनेच्या उबाठा गटाच्या राजश्री प्रजापत यांनी ४९३ मते घेत अपक्ष शांभवी गुजराथी (४२१) यांचा पराभव केला.

  • प्रभाग ७ अ मधून भाजपच्या कमल जाधव यांनी ७९३ मते घेत अपक्ष उर्मिला शेळके (३७१) यांचा पराभव केला.

    प्रभाग ७ ब मधून भाजपचे राहुल कोतवाल यांनी ८७४ मते घेत अपक्ष जितेंद्र पाटील (५७५) यांचा पराभव केला.

  • प्रभाग ८ अ मधून भाजपच्या अनिता बडोदे यांनी ७३२ मते घेत अपक्ष अश्विनी बडोदे (४३८) यांचा पराभव केला.

    प्रभाग ८ ब मधून भाजपचे महेंद्र गांधीमुथा यांनी ५३७ मते घेत अपक्ष राहुल अग्रवाल (५१७) यांचा पराभव केला.

  • प्रभाग ९ अ मधून अपक्ष उमेदवार प्रदीप बनकर यांनी ६१० मते घेत भाजपचे प्रवीण साळवे (६००) यांचा १० मतांनी पराभव केला.

    प्रभाग ९ ब मधून भाजपच्या सरला अग्रवाल यांनी ८२२ मते घेत राष्ट्रवादीच्या रेखा बनकर (३४५) यांचा ४७७ मतांनी पराभव केला.

  • प्रभाग १० अ मधून भाजपचे संभाजी गुंजाळ यांनी ७८० मते घेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे विकी गवळी (३९८) यांचा ३८२ मतांनी पराभव केला.

    प्रभाग १० ब मधून भाजपच्या लीलाबाई कोतवाल यांनी ६९५ मते घेत अपक्ष योगिता कोतवाल (५०१) यांचा १९४ मतांनी पराभव केला.

    Nashik Latest News

विजयी उमेदवार बलाबल असे

  • भाजप- ११

  • अपक्ष - ५

  • शिवसेना शिंदे गट - २

  • राष्ट्रवादी शरदचंद्र पवार- १

  • शिवसेना उबाठा गट -१

मतदारांनी आमदार डॉ. राहुल आहेर, माजी आमदार शिरीष कोतवाल यांच्यावर विश्वास ठेवत मला विजयी केले. माझ्यावर टाकलेला विश्वास शहराच्या विकासासाठी नक्कीच सार्थकी लावला जाईल.

वैभव बागुल, नगराध्यक्ष, चांदवड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news