बोगस कॉल्स, मेसेजेसपासून 95 टक्के लोक त्रस्त

‘ट्राय’च्या सर्वेक्षणातील माहिती; अटींचे पालन न केल्यास कंपन्या ब्लॅक लिस्टमध्ये
95 percent people suffer from bogus calls, messages
बोगस कॉल्स (स्पॅम ) आणि संदेशांचा देशातील 95 टक्के लोकांना त्रास.Pudhari File Photo
Published on
Updated on

बोगस कॉल्स (स्पॅम ) आणि संदेशांचा देशातील 95 टक्के लोकांना त्रास होत असल्याचे भारतीय दूरसंचार नियामक आयोगाच्या (ट्राय) सर्वेक्षणातून पुढे आले आहे. यामध्ये अनावश्यक आणि दिशाभूल करणारे 2.75 लाख मोबाईल ट्रायने ब्लॉक केले आहेत. जानेवारी ते जून या कालावधीत बनावट कॉल्सबाबत 7 लाख तक्रारी प्राप्त झाल्यावर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती ‘ट्राय’ने दिली आहे.

1. ट्रायच्या लोकल सर्कल्सद्वारे हे नुकतेच बनावट आणि फसव्या कॉल्स आणि मेसेजसंदर्भात सर्वेक्षण करण्यात आले. डू नॉट डिस्टर्ब (डीएनडी) कॉल्सचे फिचरही बंद असल्याने अशा बोगस फोन आणि संदेशचा लोकांना त्रास होत आहे.

2. गेल्या सहा महिन्यांत अशा प्रकारच्या स्पॅम कॉल्सचे प्रमाण वाढले आहे. घोटाळेबाजाकडून फेक कॉल्ससह फेक मेसेजसाठी नवनवीन क्लृप्त्या आणि युक्त्यांचा अवलंब केला जात आहे.

गेल्या सहा महिन्यात स्पॅम कॉल्समध्ये 54 टक्के ते 66 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर ट्रायने दूरसंचार कंपन्यांना प्रमोशनल मेसेजेस रोखण्याचे निर्देश दिले आहेत.

77 टक्के मोबाईलधारकांना रोज किमान 3 बोगस कॉल्स येत आहेत. यामध्ये होम लोन, क्रेडिट कार्डसह वित्तीय संस्थांकडून अशा प्रकारचे बोगस कॉल्स येत आहेत.

यासाठी कंपन्यांना आधी

* 1 सप्टेंबरपर्यंत मुदत दिली होती. ही मुदत आता 1 ऑक्टोबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.

* एसआयपी आणि पीआरआयचा दुरुपयोग केल्यास कंपन्यांना टीएसपीद्वारे दिल्या जाणार्‍या सेवा रोखल्या जातील. अशा कंपन्यांचा समावेश काळ्या यादीत टाकण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news