Nashik Crime | नामांकित कंपनीतील धर्मांतर व लैंगिक शोषण प्रकरण : ५ संशयित आरोपींना न्यायालयीन कोठडी

नाशिक न्यायालयात न्यायमूर्ती आर. सी. नरवाडिया यांच्या समोर ही सुनावणी
Nashik  Company Harassment Case
Nashik Company Harassment CasePudhari
Published on
Updated on

Nashik Company Harassment Case

नाशिक : नामांकित कंपनीशी संबंधित धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. नाशिक न्यायालयात आज (दि.१०) झालेल्या सुनावणीत ५ आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली. न्यायमूर्ती आर. सी. नरवाडिया यांच्या समोर ही सुनावणी पार पडली.

या प्रकरणातील तौसिफ अत्तार, रजा मेमन, शाहरुख कुरेशी, शफी शेख आणि असिफ अन्सारी या पाच संशयित आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तर या प्रकरणातील मुख्य संशयितांपैकी एक असलेल्या ऑपरेशन मॅनेजर अश्विनी चेनानी हिला १३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. चेनानीला पुण्यातून ताब्यात घेतल्यानंतर आज न्यायालयात हजर करण्यात आले.

Nashik  Company Harassment Case
Nashik news | लाच नाकारल्याने पोलिसांनी लष्कराचे साहित्य असलेला ट्रक पेटवला? येवल्यात खळबळ

या संपूर्ण प्रकरणाचा तपास विशेष तपास पथक (SIT) मार्फत सुरू असून, आतापर्यंत नऊ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. तपास यंत्रणा विविध बाजूंनी चौकशी करत असून, आणखी काही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, अश्विनी चेनानी हिला चार दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्याने तिच्याकडून अधिक महत्त्वाची माहिती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच, न्यायालयीन कोठडीत असलेल्या पाच आरोपींना विनयभंग आणि धार्मिक भावना दुखावल्याच्या दुसऱ्या गुन्ह्यात पुन्हा ताब्यात घेण्याची तयारी पोलीस करत आहेत.

या प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली असून, पुढील तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news