Nashik Liver Transplant Case | पत्नीच्या लिव्हर दानातून पतीला नवे जीवन

Nashik Liver Transplant Case | प्रगत आरोग्यसेवेचा टप्पा : अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये यशस्वी लिव्हर ट्रान्सप्लांट
Grade 1 fatty liver
Grade 1 fatty liver | ग्रेड-1 फॅटी लिव्हर किती धोकादायक आहे? File Photo
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

येथील अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये गंभीर लिव्हर आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णावर यशस्वी लिव्हर टान्सप्लांट शस्त्रक्रिया पार पडली. विशेष म्हणजे, रुग्णाच्या पत्नीने स्वतःच्या लिव्हरचा भाग दान करून पतीला नवजीवन दिले. नाते, प्रेम आणि आधुनिक वैद्यकीय विज्ञान यांचा संगम दाखविणारी ही शस्त्रक्रिया उत्तर महाराष्ट्रातील प्रगत आरोग्यसेवेत महत्त्वाचा टप्पा ठरली आहे.

Grade 1 fatty liver
Men's Health News : पुरुषांसाठी महत्त्वाची बातमी! इरेक्टाइल डिसफंक्शन हे हृदयविकार आणि डायबिटीजचे संकेत - रिसर्च

रुग्ण दीर्घकाळ लिव्हर सिरोसिससारख्या गंभीर आजाराने त्रस्त होता. त्याच्यावर डॉ. संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू होते. आजार प्रगत अवस्थेत गेल्यानंतर लिव्हर ट्रान्सप्लांट हाच एकमेव पर्याय असल्याचे स्पष्ट झाले. त्यावेळी पत्नीने लिव्हर दान करण्याचा धाडसी निर्णय घेतला. शस्त्रक्रियेचे नेतृत्व डॉ. अमोल जाधव यांनी केले असून, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि बहुविशेषज्ञ वैद्यकीय टीमच्या समन्वयातून ही गुंतागुंतीची प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली.

.. यांचा मोलाचा सहभाग

डॉ. पाटील यांनी सांगितले की, वेळेवर निदान आणि योग्य उपचार अत्यंत महत्त्वाचे असतात. तर डॉ. जाधव यांनी ही शस्त्रक्रिया अत्यंत कौशल्यपूर्ण असल्याचे नमूद केले. या प्रक्रियेत गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट, सर्जन, क्रिटिकल केअर तज्ज्ञ, भूलतज्ज्ञ व नर्सिंग टीमचा मोलाचा सहभाग होता. रुग्णालय प्रशासनाने सांगितले की, अशा यशस्वी शस्त्रक्रियांमुळे नाशिकमध्येच जागतिक दर्जाच्या आरोग्यसेवा उपलब्ध होत असून रुग्ण आणि दाता दोघांची प्रकृती स्थिर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news