नाशिक : नाकाबंदी दरम्यान १ लाख ९७ हजाराची रक्कम जप्त

Maharashtra Assembly Election : दुगाव फाटा येथे पोलिसांची कारवाई
Maharashtra Assembly Election
नाकाबंदी दरम्यान १ लाख ९७ हजाराची रक्कम पोलिसांनी जप्त केलीFile Photo
Published on
Updated on

नाशिक : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. दुगाव फाटा येथे बुधवारी (दि.२३) मध्यरात्री १ वाजता नाशिक तालुका पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान कारची तपासणी केली. या कारमध्ये एक लाख ९७ हजार ५०० रुपयांची रोकड आढळून आली. पोलिसांनी रोकड जप्त करून ती रोकड जिल्हा प्रशासनाकडे सोपवली आहे. पोलिसांनी कारमधील दोघांना ताब्यात घेतले असून याप्रकरणी चौकशी सुरू आहे.

Maharashtra Assembly Election
Maharashtra Assembly Election : ‘आम्ही मतदान करणार, तुम्ही सुध्दा करा’, अंध मतदारांचे आवाहन

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार भरधाव वेगात जाणारी कार पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान अडविली. या कारमध्ये एक लाख ९७ हजार ५०० इतकी बेहिशेबी रक्‍कम या कारमध्ये आढळली. त्यानंतर ही रोकड जप्त करत पोलिसांनी ती जिल्‍हा प्रशासनाकडे जमा केली. बेहिशेबी रक्कमेबद्दल दोघांना ताब्यात घेण्यात आले असून ते दोघे व्यापारी असल्याचे त्यांनी चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले. त्‍याच्‍याकडे ही रोकड कशी आली, याबाबतचा तपास सुरू आहे. नाशिक तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

Maharashtra Assembly Election
Maharashtra Assembly election| 'जनसुराज्य' विधानसभेच्या राज्यात १५ जागा लढविणार

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news