Maharashtra Assembly Election : ‘आम्ही मतदान करणार, तुम्ही सुध्दा करा’, अंध मतदारांचे आवाहन

अपंग रोजगार उद्योग व तांत्रिक प्रशिक्षण केंद्रातील अंध कर्मचाऱ्यांच्या भावना
blind voters
अंध मतदारpudhari
Published on
Updated on

आम्ही अंध असलो तरी, मतदान करण्याच्या बाबतीत आम्ही डोळस आहोत. प्रत्येक निवडणूकीत आम्ही सहभागी होत असतो. मतदानाच्या दिवशी मतदान सुरु झाल्यावर सुरवातीलाच मतदान करुन लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होतो, नागरीकांनीही उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन मतदान करावे’ अशा भावना पिंपरी विधानसभा मतदारसंघातील अजंठानगर येथील ‘होम फॉर द ब्लाईंड’ या अपंग रोजगार उद्योग व तांत्रिक प्रशिक्षण केंद्रातील अंध कर्मचाऱ्यानी व्यक्त केल्या.

‘आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करु आणि मुक्त निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणूकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणूकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करु’ या आशयाची शपथ या अंध कर्मचाऱ्यांनी यावेळी घेतली.

मतदानाच्या दिवशी आम्ही सर्वजण आपापल्या मतदान केंद्रावर जाऊन न चुकता मतदान करत असतो. निवडणूक विभागाकडून आम्हाला चांगले सहकार्य मिळते. निवडणूक विभागातर्फे व्हीलचेअर, मदतनीस उपलब्ध करुन देण्यात येतात त्यामुळे मतदान करणे आम्हाला सोपे जाते. या वेळीदेखील आम्ही विधानसभा निवडणूकीत शंभर टक्के मतदान करणार आहोत, सर्व शहरवासियांनीदेखील मतदान करावे असेही आवाहन अंध मतदारांनी यावेळी केले.

मतदारांचे पद्धतशीर शिक्षण आणि निवडणूक सहभाग (स्वीप) या उपक्रमांतर्गत जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या पुढाकाराने पिंपरी विधानसभा मतदार संघ परिसरात व्यापक प्रमाणात मतदान जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून अजंठानगर येथील ‘होम फॉर द ब्लाईंड’ या अपंग रोजगार उद्योग व तांत्रिक प्रशिक्षण केंद्रात मतदार जनजागृतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मतदान जनजागृतीच्या या कार्यक्रमास स्वीप समन्वय अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, समन्वयक विजय भोजने, दिव्यांग कक्षाचे समन्वय अधिकारी शरद पाटील, सहाय्यक समन्वय अधिकारी बालाजी गिते, नायब तहसीलदार अभिजीत केंद्रेकर तसेच केंद्राचे व्यवस्थापक सुनिल चोरडीया उपस्थित होते.

यावेळी बालाजी गिते यांनी अंध मतदारांसाठी मतदान केंद्रावर उपलब्ध असणाऱ्या रॅम्प, व्हीलचेअर, मदतनीस, मॅग्नीफाईंग ग्लास, ब्रेल मतपत्रिका याशिवाय सक्षम ऍ़पद्वारे पीक अप ऍ़ण्ड ड्रॉपची सोय इत्यादी सुविधांविषयी माहिती दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news