Nashik AIMA Election | आयमाच्या अध्यक्ष व खजिनदार पदासाठी ६४ टक्के मतदान; शनिवारी मतमोजणी

२३४५ सभासदांपैकी १४९७ सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला
mbad Industries Association
सिडको : आयमा निवडणुकीच्या मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारावर मतदारांना आवाहन करताना ललीत बुब, हर्षद बेळे, राजेंद्र पानसरे, अविनाश बोडकेPudhari
Published on
Updated on

Ambad Industries Association

सिडको : उद्योजकांची अग्रणी संस्था असलेल्या अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) यांच्या सन २०२६-२८ या कालावधीसाठी झालेल्या द्वैवार्षिक निवडणुकीत अध्यक्ष व खजिनदार पदासाठी एकूण २३४५ सभासदांपैकी १४९७ सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला. ६४ टक्के मतदान झाले. ही निवडणूक शांततेत पार पडली.

मतमोजणी आज शनिवार (दि. ३१) सकाळी ९ वाजता आयमा रिक्रिएशन सेंटर येथे होणार असून, दुपारी १ ते २ वाजेपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र, निवडणुकीचा अधिकृत निकाल रविवार (दि. १ फेब्रुवारी) होणाऱ्या आयमाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घोषित करण्यात येणार आहे.

mbad Industries Association
Nashik Rural Development |... पाच दिवसांत वाड्या-वस्त्या विजेच्या दिव्यांनी उजळल्या !

मतदानाच्या दिवशी सकाळपासूनच मतदान केंद्रावर सभासदांची मोठी गर्दी दिसून आली. अध्यक्षपदासाठी सत्ताधारी एकता पॅनलकडून विद्यमान अध्यक्ष ललित बुब आणि विरोधी उद्योजक एकता पॅनलकडून विद्यमान उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे यांच्यात थेट लढत होती. तर खजिनदार पदासाठी सत्ताधारी पॅनलचे हर्षद बेळे आणि उद्योजक एकता पॅनलचे अविनाश बोडके यांच्यात चुरशीची स्पर्धा रंगली होती.

निवडणूक प्रक्रियेदरम्यान सत्ताधारी एकता पॅनलसाठी आयमाचे माजी अध्यक्ष मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर गोपाळे, माजी अध्यक्ष धनंजय बेळे, वरुण तलवार, तसेच बिनविरोध निवडून आलेले पदाधिकारी व सदस्य सभासदांना मतदानासाठी आवाहन करत होते. तर विरोधी उद्योजक एकता पॅनलसाठी तुषार चव्हाण, संजय महाजन व माजी नगरसेवक पुंजाराम गामणे सक्रिय होते.

mbad Industries Association
Nashik Municipal Corporation | नाशिक महापालिकेत महायुतीची सत्ता

महानगरपालिकेचे निवडून आलेले शिंदे शिवसेनेचे नगरसेवक नितीन दातीर तसेच भाजपाचे नगरसेवक शरद फडोळ यांनी मतदान केंद्रास भेट देऊन पाहणी केली. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश ब्राह्मणकर व सहायक अधिकारी राजकुमार जॉली यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी चुंचाळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान केंद्राबाहेर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

दातीर यांना पोलिसांची नोटीस
सामाजिक कार्यकर्ते साहेबराव दातीर यांनी मतदानाच्या दिवशी आयमा सभागृहासमोर आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार चुंचाळे पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली होती. मात्र दातीर यांनी आंदोलनापासून दूर राहणे पसंत केले.

ओळखपत्राअभावी २० ते २२ मतदारांना मतदानास मज्जाव
मतदानासाठी आवश्यक आधारकार्ड, पासपोर्ट अथवा इतर वैध ओळखपत्रे सादर न केल्यामुळे २० ते २२ मतदारांना मतदान करता आले नाही, अशी माहिती निवडणूक प्रशासनाने दिली.

mbad Industries Association
Nashik Crime : लेखानगरात टोळक्याचा हैदोस; धारदार शस्त्रे नाचवत वाहनांची तोडफोड

आयमा निवडणुकीची मतमोजणी आज शनिवार, दि. ३१ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता करण्यात येणार आहे. मतमोजणीसाठी ४ टेबलांवर १६ कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून निकाल दुपारी १ ते २ वाजेपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे.

— प्रकाश ब्राह्मणकर, मुख्य निवडणूक अधिकारी, आयमा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news