

नाशिक (पुढारी वृत्तसेवा): दिवाळीच्या काळात फटाक्यांच्या आतबाजीतमुळे निर्माण झालेल्या धुराने आणि वाढत्या वायुप्रदूूषणाने गुदमरलेल्या नाशिककरांना आता काहीसा दिलासा मिळाला आहे. दिवाळीनंतर शहरातील हवेच्या गुणवतेत लक्षणीय सुधारणा झाली असून, खराब श्रेणीत पोहोचलेला हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) अवघ्या तीन दिवसांत मध्यम श्रेणीत आला आहे.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) ताज्या आकडेवारीनुसार, ९ नोव्हेंबर रोजी २३२ वर असलेला शहराचा सरासरी एक्यूआय १० नोव्हेंबरला थेट १५४ वर घसरला, तर ११ नोव्हेंबरला तो १५४ वर नोंदविण्यात आला. अवघ्या दोन दिवसांत निर्देशकांत ७४ अंकांची घट झाल्याने शहरातील प्रदूषणाची तीव्रता कमी झाल्याचे स्पष्ट झाले.
दिवाळीच्या उत्सवात फटाक्यांची मोठ्या प्रमाणावर आतबाजीत झाल्याने ७ व ९ नोव्हेंबरदरम्यान नाशिकच्या हवेची गुणवत्ता खालावली होती. फटाक्यांमधून बाहेर पडणारे सूक्ष्म धुलिकण, वाहनांचा धूर, बांधकामामुळे हवेत पसरणारी धूल आणि थंडीच्या दिवसात वातावरणात जमिनीत साचून राहणारे प्रदूषक यांचा एकत्रित परिणाम शहराच्या हवेवर झाला.
परिणामी, शहरातील चारही प्रदूषण मापन केंद्रांवर हवा गुणवत्ता निर्देशांक खराब श्रेणीत पोहोचला होता. मात्र, दिवाळीचा उत्साह ओसरल्यानंतर फटाक्यांचा धूर निवळणे, वाऱ्याची हालचाल आणि आपापणातील बदल यामुळे वातावरणातील प्रदूषकांचे प्रमाण कमी होण्यास मदत झाली. त्यामुळे हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
पांडवनगरीत प्रदूषणाचा विळखा कायम
शहराच्या सरासरी एक्यूआयमध्ये सुधारणा झाली असली, तरी सर्वच भागातील हवा समान प्रमाणात स्वच्छ झालेली नाही. ११ नोव्हेंबरच्या आकडेवारीनुसार, पांडवनगरीत सर्वाधिक १८४ एक्यूआय नोंदविण्यात आला.
त्याखालोखाल हिवरवाडी येथे १५२, गंगापूर रस्त्यावर १४८, तर अंबड औद्योगिक वसाहतीत सर्वात कमी १३२ एक्यूआयची नोंद झाली. चारही केंद्रावरील निर्देशांक मध्यम श्रेणीत असला, तरी पांडवनगरीतील प्रदूषणाचे प्रमाण तुलनेने अधिक असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. याउलट ९ नोव्हेंबर रोजी शहरातील परिस्थिती अधिक चिंताजनक होती.
पांडवनगरी येथे २८८, हिवरवाडी येथे २२८, गंगापूर रस्त्यावर २१५ आणि अंबड औद्योगिक वसाहतीत २०४ असा एक्यूआय नोंदविण्यात आला होता. म्हणजेच शहरातील सर्वच चारही केंद्रावरील हवा खराब श्रेणीत पोहोचली होती. विशेषतः पांडवनगरी परिसरात सूक्ष्म धुलिकण अर्थात पीएम २.५ हे प्रमुख प्रदूषक आढळले होते. अतिसूक्ष्म कण श्वासोच्छवासारे शरीरात प्रवेश करू शकत असल्याने आरोग्याच्या दृष्टीने त्यांची उपस्थिती चिंताजनक मानली जाते.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषानुसार, ० ते ५० एक्यूआय चांगला, ५१ ते १०० समाधानकारक, १०१ ते २०० मध्यम, २०१ ते ३०० खराब, ३०१ ते ४०० अतिशय खराब, तर ४०१ ते ५०० गंभीर श्रेणी मानली जातील. सध्या नाशिकचा एक्यूआय मध्यम श्रेणीत आला आला असला, तरी याचा अर्थ शहरातील हवा पूर्णपणे प्रदूषणमुक्त झाली, असा होत नाही. मध्यम श्रेणीतील हवेमुळेही संवेदनशील नागरिकांना त्रास जाणवू शकतो.
विशेषतः दमा आणि हृदयविकार असलेले रुग्ण, लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिकांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. घसा खवखवणे, डोळ्यांची जळजळ आणि दम लागणे यांसारखे त्रास उद्भवू शकतात. त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी प्रदूषणाचे प्रमाण अधिक असण्याची शक्यता असलेल्या वेळेत अनावश्यक बाहेर पडणे टाळावे. गर्दीच्या आणि वाहतुकीच्या रस्त्यावर जाताना योग्य मास्कचा वापर करावा, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो.
स्वीकृत नगरसेवकपदावरून भाजपात नाराजी उफाळून आली असून, राष्ट्रवादी काँग्रेसमधील पदाचा राजीनामा देत २०२३ मध्ये भाजपात प्रवेश केलेले प्रदेश कार्यकारिणी सदस्य महेश भामरे यांनी पक्षातील वागणुकीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पत्नी अनिता भामरे यांना महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारी देण्याचा शब्द देऊनही डावलण्यात आले.
त्यानंतर स्वीकृत नगरसेवक पदासाठी संधी नाकारण्यात आल्याची त्यांनी केली आहे. त्यामुळे आगामी भाजपा प्रदेश अधिवेशनात आम्हाला पक्षातून बाहेर काढावे, अशी उपरोधिक मागणी त्यांनी केली आहे. भामरे यांनी सोशल मीडियावर व्यक्त केलेल्या भावना या पक्षातील कार्यकर्त्यांच्या अपेक्षा आणि नाराजी अधोरेखित करताना, भाजपात प्रवेश करताना तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवेश केल्याचे त्यांनी म्हटले आहे.
महानगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक १५ मधून पत्नी अनिता भामरे यांना उमेदवारी देण्याचा शब्द दिला होता. मात्र, पक्षासाठी सदस्य नोंदणी, प्रचार, बूथ अध्यक्ष, शक्तिकेंद्रप्रमुख म्हणून काम करूनही उमेदवारी नाकारण्यात आल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. निवडणूकनंतर स्वीकृत नगरसेवक पदासाठी विनंती केली; मात्र जातीय समीकरणसाची आल्याने संधी नाकारल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
मराठा असल्यामुळे आपल्याला डावलले जात आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पक्षात प्रवेश करूनही न्याय मिळत नसेल, तर पक्षात राहण्याचा उपयोग काय, असा प्रश्न उपस्थित करत भविष्य भाजपाप्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांनी यातून बोध घ्यावा, असे आवाहन भामरे यांनी केले आहे.