Nashik District Collectorate | दुष्काळी अनुदानातून कर्जवसुली करू नका

Nashik District Collectorate | निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचे बँकांना कडक निर्देश
नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय / Nashik District Collector's Office
नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय / Nashik District Collector's OfficePudhari News Network
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
खरीप हंगाम २०२६ मधील दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधील बाधित शेतकऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांची अग्रीम मदत मंजूर केली आहे. त्यानुषंगाने दुष्काळामुळे बाधित शेतकऱ्यांना मंजूर केलेल्या अग्रीम मदतीतून तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीपोटी मिळणाऱ्या अनुदानातून जिल्ह्यातील सर्व बँकांनी कोणत्याही प्रकारची कर्जवसुली करू नये.

नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय / Nashik District Collector's Office
Nashik Municipal Corporation | नाशिक महापालिकेच्या जन्म-मृत्यू दाखल्यांच्या चौकशीत 690 नोंदींमध्ये फेरफार उघड

तसेच संबंधित अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाल्यानंतर ती रक्कम होल्ड वा कपात करू नये, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी केले आहे. या मदतीसह नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीपोटी शासनाकडून प्राप्त होणारे अनुदान शेतकऱ्यांना त्यांच्या अडचणीच्या काळात दिलासा देण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीपोटी शासनाकडून प्राप्त होणारे अनुदान बाधित शेतकऱ्यांना विनाअडथळा उपलब्ध होण्यासाठी शासनाची मदत व अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात वळती करण्यात येऊ नये.

नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय / Nashik District Collector's Office
Nashik Kumbh Mela 2026: नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यात 'अमृत स्नान' कधी? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

यापूर्वी अशा प्रकारे रक्कम वळती केली असल्यास किंवा खात्यावर होल्ड ठेवले असल्यास, प्रकरणांची तपासणी करून लागू कायदे व नियमांनुसार आवश्यक ती कार्यवाही करावी. जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक, तसेच जिल्हा उपनिबंधक यांनी जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयीकृत बँका, सहकारी बँका व इतर बँकांच्या शाखा व्यवस्थापाकांना या निर्देशांची माहिती देऊन त्यांचे काटेकोर पालन होईल, याची दक्षता घ्यावी.

या निर्देशांचे उल्लंघन झाल्यास लागू कायदे व नियमांनुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. त्यामुळे सर्व संबंधित बँकांनी या निर्देशांची तत्काळ अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हा निवासी उपजिल्हाधिकारी राजपूत यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news