

नगरसुल (नाशिक) : सायगाव येथील चंपाषष्टीनिमित्त आयोजित खंडोराव महाराज यात्रेतून घरी परतणाऱ्या दोघांची दुचाकी थेट पाटात पडल्याने त्यांचा मृत्यू झाला.
येथील प्रसाद पवार (19) आणि सुशांत फरताळे (16) हे दोघे मित्रासमवेत सायगाव येथील खंडोराव महाराज यात्रेतून परत आले. आपल्या मित्राला घरी सोडुन हे दोघे घरी परतत असताना कोळगाव रस्त्यालगत असणाऱ्या पाटाच्या वळणाचा अंदाज त्यांना आला नाही. भरधाव वेगातील त्यांची दुचाकी पाटात पडल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्याला नाशिकला उपचाराला नेत असताना वाटेतच मृत्यू झाला.