

घोटी (नाशिक): घोटी सिन्नर मार्गावरील धामणी शिवारात कंटेनरची धडक बसून दोन दुचाकीस्वार जागीच ठार झाले आहे.
सोमवारी (दि. 3) सकाळी घोटी भंडारदरा रोडने धामणी गावाजवळील पूलावर कंटेनर (टीएन 88 एल 6014) भरधाव वेगाने घोटीच्या बाजूने धामणगाव कडे जात असताना धामणी गावाजवळील पुलावर त्याच्यापुढे चालणाऱ्या मोटरसायकलला (एम एच 15 क्यू 9871) पाठीमागून धडकला. या अपघातामध्ये मोटरसायकलवरील नवसू बुधा लोटे (60, गिरणारे) तसेच दशरथ रामभाऊ थिटे (78 रा. खेड) हे जागीच गतप्राण झाले. पोलिसांनी कंटेनरचालक गुफरान साकीर याला अटक केली आहे.