Accident File Photo
नाशिक
Nashik Accident News | अशोकस्तंभावर ट्रॅक्टरखाली दुचाकी आल्याने महिला ठार
ट्रॅक्टर अपघातात महिला ठार
नाशिक : दुचाकीवरून जात असताना तोल गेल्याने ट्रॅक्टरखाली सापडून महिला ठार झाल्याची घटना अशोकस्तंभ परिसरातील वास्तल्य आधार आश्रमासमोर सोमवारी (दि. ३) सकाळी ११.३० वाजता घडली.
अलका देवराज गुज्जर (३१, रा. बोरगड, म्हसरूळ) असे या महिलेचे नाव आहे. अपघातानंतर चालक फरार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. गुज्जर या अशोकस्तंभकडून घारपुरे पुलाकडे दुचाकीवरून जात होत्या. त्यावेळी त्यांनी कानाला हेडफोन लावले होते. दुचाकी शेजारून ट्रॅक्टर जात असताना त्यांचा तोल गेला. त्यात दुचाकी रस्त्याच्या डाव्या बाजूल पडली तर त्या रस्त्यावर पडल्या. तितक्यात टॅक्टरच्या ट्रॉलीखाली आल्याने त्या जखमी झाल्या. नागरिकांना त्यांना त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र, उपचाराआधी यांचा मृत्यू झाला.

