

सिन्नर : नाशिक-पुणे महामार्गावरील सिन्नर बायपासवर मनेगाव शिवारातल्या सिन्नर गेस्ट हाऊस समोर कार दुभाजकावर धडकून अपघात झाला. यात सात प्रवासी जखमी झाले आहेत. पोलिसांनी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
कार (एमएच १५, बीडी ८५४१) ही पुण्याहून नाशिकच्या दिशेने जात होती. यावेळी वेगाने जाणाऱ्या कारची दुभाजकावरील पत्र्याला जोराची धडक बसली. त्यामुळे कारवरील नियंत्रण सुटून अपघात झाला.
या अपघातात परमेश्वर आसाराम पराडे (४३), कार्तिक परमेश्वर पराडे (२१), ऋतुजा परमेश्वर पराडे (१६, तिघे रा. उत्तमनगर, सिडको, नाशिक) हे गंभीर जखमी झाले आहेत. तर मनीषा परमेश्वर पराडे (३८), भूमी गौतम पराडे, नेत्रा गौतम दाभाडे (१३), कुशान गौतम दाभाडे (११, रा. गोकुळ नगर, दाभाडेचाळ, आंबेडकर नगर, ठाणे) हे किरकोळ जखमी झाले आहेत. घटनेचा अधिक तपास हवालदार वराडे करत आहेत.