

नाशिक: छत्रपती संभाजीनगर नाका येथे सीटीलिंक बसची धडक बसून पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. मयताचे नाव बाळू सुखदेव अहिरे (वय ५०, रा. मीनाताई ठाकरे स्टेडियम परिसर, पंचवटी) असे आहे.
शनिवारी (दि.1) दुपारी सुमारे १२ वाजेच्या सुमारास ते रस्ता ओलांडत असताना सीएनजी भरून निघालेल्या तपोवन डेपोची सिटीलिंक बसने त्यांना जोरदार धडक दिली. बसच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी तत्काळ अहिरे यांना बाहेर काढून रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवले; मात्र तेथे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.