सिडको : अंबड औद्योगिक वसाहतीत दत्तनगर चुंचाळे येथे सराफाने बेकायदेशीर सोने तारण ठेवून व्याजाने रक्कम देण्याच्या प्रकारावरून १५ ग्राहकांना तब्बल ३८ लाख रुपयांचा गंडा घातला आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चुंचाळेतील कारगिल चौक येथे स्वप्नील दुसाने (३८) व दिपाली दुसाने (३५) यांचे दुसाने ज्वेलर्स नावाने दुकान आहे. संशयित दुसाने हे सोने तारणावर व्याजाने रक्कम देतात. त्यांना तारणाची सर्व रक्कम देऊनही त्याने सोने परत केले नाही. तसेच मेपासून ज्वेलर्सचे दुकान बंद असल्याची फिर्याद विशाल साळवे (रा. प्रशांतनगर, पाथर्डीफाटा) यांनी दिली. संशयित दुसाने यांनी १५ जणांची ३८ लाख ५६ हजार रुपयांची फसवणुक केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी अंबड चुंचाळे पोलिस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला. फसवणुक झालेल्या ग्राहकांनी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस उप निरीक्षक अतुल पाटील यांनी केले आहे.