Crime News | नंदुरबारमधील अल्पवयीन मुलांच्या लैंगिक शोषण प्रकरणाची व्याप्ती वाढली; अनेक बालके जाळ्यात अडकल्याचा संशय

Crime News | शहरातील अल्पवयीन बालके व युवकांच्या लैंगिक शोषण प्रकरणाची व्याप्ती मोठ्या प्रमाणात असल्याचे आतापर्यंतच्या चौकशीत समोर आले असून अनेक बालके व युवक या शोषणास बळी पडल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
Child assault case
Child assault casePudhari
Published on
Updated on

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा
शहरातील अल्पवयीन बालके व युवकांच्या लैंगिक शोषण प्रकरणाची व्याप्ती मोठ्या प्रमाणात असल्याचे आतापर्यंतच्या चौकशीत समोर आले असून अनेक बालके व युवक या शोषणास बळी पडल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. दरम्यान, माहिती गुपित ठेवली जाणार असल्यामुळे कोणत्याही दबावाला बळी न पडता न घाबरता पालकांनी अथवा मुलांनी पुढे यावे आणि पोलिस तपासात सहकार्य करावे, असे आवाहन शहर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Child assault case
Nashik-Pune Railway | नाशिक-पुणे सरळ रेल्वेमार्गासाठी गोंदे फाट्यावर जनसागर; समृद्धी महामार्गही आंदोलकांनी रोखला!

अल्पवयीन बालके तसेच युवकांना पैशांचे आमिष दाखवून त्यांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी चेतन प्रकाश कोळी (२२, रा. रायसिंगपुरा, नंदुरबार) यास पोलिसांनी ७ ऑगस्ट रोजी पहाटे यापूर्वीच ताब्यात घेतले आहे.

न्यायालयाने त्याला १२ ऑगस्ट २०२६ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, ज्या मोबाईलच्या साहाय्याने त्याने व्हिडिओ क्लिप्स बनवल्या, त्याची दोन दिवसांपासून तपासणी सुरू असून या तपासात आणखी धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहेत. प्रकरणाची व्याप्ती वाढली असल्याचे शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे.

Child assault case
Nashik Earthquake | रात्री 10 वाजता जमिनीतून मोठा आवाज अन् थरकाप; नाशिक जिल्ह्यात एकाच रात्री भूकंपाचे 4 धक्के

नंदुरबार शहर पोलिसांचे आवाहन

नंदुरबार शहर पोलिसांकडून नागरिकांना व पालकांना जाहीर आवाहन करण्यात आले आहे. आपल्या कुटुंबातील अथवा परिसरातील मुले व युवक कोणत्या ही प्रकारच्या ब्लॅकमेलिंग, धमकी किंवा शोषणाला बळी पडत असल्याचे आढळून आल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये.

भीती बाळगू नये, पुढे या आरोपीच्या भीतीपोटी किंवा सामाजिक प्रतिष्ठेच्या कारणास्तव ज्या बालकांनी किंवा युवकांनी अद्याप पोलिसांशी संपर्क साधलेला नाही, त्यांनी कोणतीही भीती अथवा संकोच न बाळगता पोलिसांशी संपर्क साधावा.

पीडितांची गोपनीयता राखली जाईल विशेषतः अल्पवयीन पीडितांच्या बाबतीत कायद्यानुसार त्यांची ओळख, नाव व वैयक्तिक माहिती गोपनीय ठेवण्यात येईल. पोलिसांना सहकार्य करा; या गंभीर प्रकरणासंदर्भात कोणाकडेही माहिती पुरावे अथवा संबंधित व्यक्तींबाबत माहिती असल्यास त्यांनी पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news