नांदगांव : नांदगाव तालुक्यातील नांदगाव येवला महामार्गावरील बाणगाव येथे तिघांचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
नांदगांव येथील नदी किनारी वाल्मीक बापू इटनर (वय १५) हा बालक मेंढी धुत असताना पाण्यात पडला, तो पाण्यात पडल्याचे त्याच्या आईच्या लक्षात आल्यानंतर त्याला वाचविण्यासाठी मुलाची आई इंदूबाई बापू इटनर (रा.खीर्डी ता.नांदगाव वय ३५) आणि मुलाचा मामा अंबादास केरूबा खरात (वय २९ रा. खिर्दी) हे दोघे पाण्यात उतरले. पण दुर्दैवाने तिघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. सदर घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पुढील तपास करत आहे.