नाशिकच्या नांदगाव येथे शिवसृष्टीचे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

Nandgaon Shiva Srishti | शिवरायांचा २९ फुटी पूर्णाकृती अश्वारूढ पुतळा
Shiva Shrishti nandgaon
शिवसृष्टीचे संकल्पचित्रpudhari news
Published on
Updated on

नांदगाव : शहरात आमदार सुहास कांदे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या शिवसृष्टीचे शुक्रवारी (दि. ३०) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. (CM inaugurates Shiva Srishti) दुपारी तीन वाजता होणाऱ्या सोहळ्याला जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे, ग्रामविकास पंचायत राज व पर्यटनमंत्री गिरीश महाजन, शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी, खा. श्रीकांत शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते, स्वप्निल बांदोडकर आणि पार्श्वगायिका वैशाली सामंत यांची मैफलदेखील रंगणार आहे.

शिवसृष्टीची ठळक वैशिष्ट्ये 

Summary
  • भव्य प्रवेशद्वार

  • शिवरायांचा २९ फुटी पूर्णाकृती अश्वारूढ पुतळा

  • शिवकालीन ऐतिहासिक प्रतिकृतींचे संग्रहालय

  • शिवचरित्रावरील ग्रंथसंपदा असलेले वाचनालय

  • शिव चित्रपटगृह, शिवभोजनालय

Shiva Shrishti nandgaon
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणाची संयुक्त तांत्रिक समिती चौकशी करणार

मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्तेच ऑनलाइन पद्धतीने शिवसृष्टीचे भूमिपूजन झाले होते. छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते शहरातील शिवसृष्टीचे नूतनीकरण झाले होते. तेव्हा आमदार कांदे यांनी लक्षवेधी शिवसृष्टी उभारण्याचा शब्द दिला होता. त्यानुसार १३ कोटी निधी खर्चातून अडीच एकर क्षेत्र विकसित केले गेले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा २९ फूट उंचीचा पूर्णाकृती ब्राँझ धातूचा अश्वारूढ पुतळा बसविण्यात आला आहे. तसेच शिवरायांच्या जीवनचरित्रावर आधारित शिवकालीन इतिहास, संस्कृती आणि पारंपरिक वारसा यांचे दर्शन या शिवसृष्टीत घडणार आहे. याठिकाणी शिव चित्रपटगृहदेखील असून, त्यात शिवरायांवरील चित्रपट पाहण्याची शिवप्रेमींना संधी मिळणार आहे. पर्यटकांसाठी शिवभोजनालय व कारंजांसह हिरवळीने नटलेले उद्यान विकसित केले आहे. अजून २० कोटी मंजूर झाले असल्याने या प्रकल्पामुळे शहराच्या सौंदर्यात भर तर पडणारच असून, शिवाय पर्यटनालादेखील चालना मिळणार आहे.

आज स्वप्नपूर्ती होत असल्याचा आनंद आहे. माझ्या राजाची शिवसृष्टी नांदगावमध्ये उभी राहिली, याचा सार्थ अभिमान वाटतोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण होत असलेल्या या सोहळ्याला जिल्ह्यातील शिवप्रेमींनी उपस्थित राहावे.

-सुहास कांदे, आमदार, नांदगाव

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news