Chandwad Mystery Drone | चांदवड तालुक्यात रात्रीच्या वेळी गुढ ड्रोनच्या घिरट्या! दरेगाव परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Chandwad Mystery Drone | चांदवडकरांमध्ये भीती ; पोलिसांची ग्रामस्थांसह शोधमोहीम
Drone Wildlife Conservation Technology
DronePudhari
Published on: 
Updated on: 

चांदवड : पुढारी वृत्तसेवा

चांदवड तालुक्यातील काही ग्रामीण भागांत गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी आकाशात ड्रोन घिरट्या घालत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास येत आहे. अंधारात गावांच्या परिसरात अचानक दिसणाऱ्या या ड्रोनमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ड्रोन नेमके कुणाचे, रात्रीच्या वेळी ते कोणत्या उद्देशाने उडविले जात आहेत आणि त्यासाठी आवश्यक परवानगी आहे का, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Drone Wildlife Conservation Technology
Chandwad Drought | नाशिकच्या चांदवड तालुक्यात दुष्काळावरून राजकारण तापले!

ड्रोनच्या हालचालींचे फोटो व व्हिडिओ नागरिकांकडून सोशल मीडियावर प्रसारित होत असून, त्यावरून विविध चर्चांना उधाण आले आहे. हे ड्रोन शासकीय अथवा खाजगी सर्वेक्षणासाठी असावेत, असे काही नागरिकांचे म्हणणे आहे; मात्र या चर्चांना अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे अपुऱ्या माहितीतून अफवांनाही वाव मिळत आहे.

या प्रकाराची पोलिसांनी दखल घेतली असून, दरेगाव परिसरात पोलिस पथकाने ग्रामस्थांच्या मदतीने ड्रोनचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पोलिस निरीक्षक अभिजित सोनवणे यांनी सांगितले की, काल आमची टीम दरेगाव येथे सुमारे ५० ग्रामस्थांसह ड्रोनचा शोध घेत होती. मात्र, ड्रोन उंचावर असल्यामुळे त्याचा शोध घेण्यात अडचणी आल्या. रात्री दहानंतर ड्रोन दिसणे बंद झाल्याने ते प्रत्यक्षात आढळून आले नाही.

Drone Wildlife Conservation Technology
Nashik Drought | चांदवड अन् नाशिक तालुका दुष्काळग्रस्त यादीत समाविष्ट होणार? जिल्हा प्रशासनाचा शासनाला अहवाल!

प्रशासनाने माहिती देणे आवश्यक ?

गावांच्या परिसरात रात्रीच्या वेळी ड्रोन उडत असतील, तर त्याबाबत स्थानिक प्रशासन आणि पोलिस यंत्रणेला पूर्वकल्पना आहे का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. संबंधित ड्रोन शासकीय कामासाठी वापरले जात असतील, तर कोणत्या विभागाकडून हे काम सुरू आहे, सर्वेक्षणाचा उद्देश काय आहे आणि त्यासाठी कोणत्या कालावधीची परवानगी देण्यात आली आहे, याबाबत प्रशासनाने स्पष्टता देणे आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news