Copper theft : मुसळगावात सहा लाखांच्या कॉपर चोरीचा प्रकार

आकांक्षा एलिमेंट इंडस्ट्रिजमधून 608 किलो तांबे लंपास
copper theft
मुसळगावात सहा लाखांच्या कॉपर चोरीचा प्रकारFile Photo
Published on
Updated on

सिन्नर : मुसळगाव औद्योगिक वसाहत परिसरातील आकांक्षा एलिमेंट इंडस्ट्रिज प्रा. लि. या कंपनीतून सुमारे सहा लाख आठ हजार रुपये किमतीचा 608 किलो वजनाचा कॉपर (तांबे) चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी एमआयडीसी सिन्नर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी कमलसिंग रामेश्वर सिंग (वय 52) हे आकांक्षा एलिमेंट इंडस्ट्रिज प्रा. लि. या कंपनीत कार्यरत आहेत. मंगळवारी (दि. 6) रात्री अज्ञात व्यक्तीने कंपनीच्या आवारातून तांब्याच्या तारा व चुरा चोरी करून नेल्या.

copper theft
Marathi Christian Literature Conference : जातीय राजकारणाला साहित्यानेच उत्तर देता येईल

चोरट्यांनी एक लाख 95 हजार रुपये किमतीच्या 195 किलो वजनाच्या कॉपर तारा तसेच चार लाख 13 हजार रुपये किमतीचा 413 किलो वजनाचा कॉपर चुरा असे एकूण सहा लाख आठ हजार रुपये किमतीचे 608 किलो तांबे चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस हवालदार गायकवाड करीत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहे.

copper theft
Talegaon gutkha seizure : तळेगावला नऊ कोटींचा प्रतिबंधित गुटखा जप्त

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news