

नाशिकरोड : मुंबईच्या लोकल रेल्वेमधील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील दोन आरोपींपैकी एकाची न्यायालयाच्या निकालानंतर नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहातून सुटका करण्यात आली.
मुजम्मील अत्तारकर रेहमान शेख व मोहम्मद साजिद मरगुब अन्सारी हे दोघेजण २०१६ पासून नाशिकच्या कारागृहात शिक्षा होते. यातील अन्सारी हा पत्नीच्या आजारपणामुळे पॅरोलवर आहे. शेख कारागृहात होता. सोमवारी न्यायालयाकडून या दोघांच्या मुक्ततेचा इ-मेल आदेश प्राप्त झाल्यानंतर सायंकाळी त्याची सुटका करण्यात आली. दरम्यान, शेख याने निर्दोष मुक्ताता झाल्यानंतर न्याय मिळाल्याची प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना दिली.