MSRTC Bus Services | पावसाशी दोन हात करत धावली एसटी

MSRTC Bus Services | रद्द फेऱ्या ३,४३१ वरून थेट ८९ वर; अतिवृष्टीच्या काळात प्रवाशांना मोठा दिलासा
ST bus MSRTC
ST bus MSRTC ST bus MSRTC
Published on
Updated on

नाशिक : निखिल रोकडे

राज्यात सर्वत्र मुसळधारेने थैमान घातले असतानाही राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवाशांची गैरसोय कमीत कमी होण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले. अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली जाणे, दरडी कोसळणे आणि पूल व रस्त्यांवर पाणी साचल्याने काही बसफेऱ्या रद्द कराव्या लागल्या. मात्र, पावसाचा जोर कमी होताच महामंडळाने सेवा वेगाने पूर्ववत करत अवघ्या एका दिवसात रद्द फेऱ्यांची संख्या ३,४३१ वरून केवळ ८९ पर्यंत आणली. त्यामुळे राज्यभरातील हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ST bus MSRTC
PMPML Electric Bus: पीएमपी ताफ्यात 15 दिवसांत 50 नवीन ई-बस; पुणे प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा

महामंडळाच्या आकडेवारीनुसार, ५ जुलै रोजी राज्यभरात ३९६ नियत फेऱ्या आणि ३,४३१ बसफेऱ्या रद्द झाल्या. त्यामुळे १ लाख ५० हजार ६५०.२ किलोमीटर अंतराची सेवा प्रभावित झाली. या परिस्थितीमुळे महामंडळाला ५८ लाख १० हजार १४८ रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागले.

मात्र, ६ जुलै रोजी एसटीची सेवा पुन्हा सुरळीत झाली. राज्यभरात केवळ १५ नियत फेऱ्या आणि ८९ बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या. रद्द किलोमीटरचे प्रमाण १०,३३०.१ इतके राहिले, तर महसुली तोटा ३ लाख ७ हजार १८४ रुपये इतकाच नोंदविण्यात आला. यावरून बहुतांश मार्गावरील एसटी सेवा पूर्ववत झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

ST bus MSRTC
KMT New Buses | कर्जाच्या बळावर केएमटीची नव्याने घोडदौड; ५० नव्या डिझेल बस घेणार

मुंबई प्रदेशात ६ जुलै रोजी केवळ सिंधुदुर्ग विभागातील एक नियत आणि आठ बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या. नागपूर, पुणे आणि अमरावती प्रदेशातील सेवा जवळपास पूर्णपणे सुरळीत राहिली. दरम्यान, हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन एसटी प्रशासनाने सर्व विभागीय नियंत्रण कक्षांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

प्रवाशांनी प्रवासापूर्वी संबंधित आगाराशी किंवा एसटीच्या अधिकृत माध्यमांवरून बससेवेची अद्ययावत माहिती घेऊनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन महामंडळाने केले आहे. नाशिक विभागात पावसाचा परिणाम कायम असल्याने नाशिक व अहिल्यानगर विभागात मिळून १४ नियत फेऱ्या आणि ८१ बसफेऱ्या रद्द कराव्या लागल्या. त्यामुळे ६,१२०.७ किलोमीटर सेवा प्रभावित झाली आणि २ लाख १५ हजार ३४६ रुपयांचे उत्पन्न बुडाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news