MSRTC Educational Trips Revenue | शैक्षणिक सहलीतून एसटीला सव्वाशे कोटी महसूल

MSRTC Educational Trips Revenue | गतवर्षापेक्षा 33 कोटींनी वाढ, शिक्षण संस्थांची एसटीला अधिक पसंती
Passengers increased, bus trips decreased.
Passengers increased, bus trips decreased.
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शैक्षणिक संस्थांच्या खासगी बसेस असतानाही मात्र विद्यार्थ्यांचा अभ्यास दौरा किंवा शैक्षणिक सहलींसाठी शिक्षण संस्थांनी एसटीलाच अधिक पसंती दिली आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरात एसटीला शैक्षणिक सहलीतून तब्बल १२७ कोटींचा महसूल मिळाला आहे. मागील वर्षापेक्षा सुमारे ३३ कोटींनी अधिक उत्पन्न वाढले आहे.

Passengers increased, bus trips decreased.
Nashik MNC Case SIT | नाशिक MNC कंपनीतील लैंगिक शोषण प्रकरणी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक ॲक्शन मोडमध्ये, 'एसआयटी' स्थापन

राज्य मार्ग परिवहन महामंडळाने वर्षभरात शैक्षणिक सहलीसाठी २५ हजार ५१८ बसफेऱ्यांच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक करत तब्बल १२७ कोटी १८ लाख रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळवले आहे.

हे उत्पन्न मागील वर्षाच्या तुलनेत ३३ कोटी २९ लाखांनी अधिक आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित सहलींसाठी एसटीशिवाय पर्याय नाही, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. मागील शैक्षणिक वर्षात विविध धार्मिक व ऐतिहासिक पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयांकडून सहली आयोजित केल्या गेल्या.

Passengers increased, bus trips decreased.
Forced Conversion Allegations | धक्कादायक खुलासा! कंपनीतील पुरुषाचेही जबरदस्तीने धर्मांतर; नाव बदलून धार्मिक चौकटीत ओढले

या सहली एसटीच्या माध्यमातून आयोजित केल्यास विद्यार्थ्यांना प्रवासी भाड्यात शासनाकडून ५० टक्के सवलत दिली जाते. त्यामुळे एसटीमार्फत आयोजित सहली सुरक्षित, विश्वासार्ह आणि माफक दरात उपलब्ध होतात. विशेषतः ग्रामीण भागातील लाखो विद्यार्थी-विद्यार्थिनींनी याचा लाभ घेतला.

यंदाच्या शैक्षणिक वर्षात राज्यभरातील विविध शाळा व महाविद्यालयांच्या मागणीनुसार एसटी महामंडळाने तब्बल २५ हजार ५५८ बसफेऱ्या उपलब्ध करून दिल्या. या फेऱ्यांद्वारे लाखो विद्यार्थ्यांनी विविध धार्मिक व ऐतिहासिक पर्यटनस्थळांना भेटी दिल्या. यावर्षी बहुतांश शालेय सहलींसाठी एसटीने नव्या आणि अद्ययावत बसेस उपलब्ध करून दिल्यामुळे विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित, आरामदायी आणि समाधानकारक झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news