MPSC Interview 2026 | MPSC मुलाखतींचे वेळापत्रक जाहीर! डिसेंबरमध्ये चार संवर्गातील पदांसाठी मुलाखती

MPSC Interview 2026 | सरकारी नोकरीच्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी! MPSC मुलाखती १५ ते २३ डिसेंबरदरम्यान
Competitive Exams
Competitive ExamsPudhari
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध संवर्गातील पदभरतीसाठी होणाऱ्या मुलाखतींचे वेळापत्रक जाहीर केले आहे. प्राध्यापक, वैद्यकीय अधिकारी, उपसंचालक, व्यवसाय शिक्षण आणि सहायक वनसंरक्षक अशा चार संवर्गातील पदांसाठी छाननीअंती व चाळणी परीक्षेअंती मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती डिसेंबर महिन्यात पार पडणार आहेत. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाने २७ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध केले आहे.

Competitive Exams
Maharashtra Aapla Dawakhana Services आपला दवाखाना बंद करण्याचा निर्णय; ठाणे, नाशिक आणि नागपूरमधील सेवा २ नोव्हेंबरपासून बंद

आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालय व दंत महाविद्यालयातील कृत्रिम दंतशास्त्र विभागातील प्राध्यापक (गट-अ) पदासाठी १५ डिसेंबर २०२६ रोजी मुलाखती होणार आहेत. या पदासाठी जाहिरात क्रमांक १३३/२०२५ अंतर्गत प्रक्रिया राबविली आहे.

महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ (सार्वजनिक आरोग्य विभाग) अंतर्गत स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी या विशेषज्ञ संवर्गातील पदांसाठी १६, १७ आणि १८ डिसेंबर २०२६ रोजी मुलाखती आयोजित केल्या आहेत. या पदासाठी जाहिरात क्रमांक ००७/२०२५ अंतर्गत भरती प्रक्रिया सुरू आहे.

Competitive Exams
Nashik Bomb Threat | नाशिक जिल्हा न्यायालयाला बॉम्बस्फोटाची धमकी; सहावा मजला उडवण्याचा ई-मेल

तसेच कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ (तांत्रिक) वरिष्ठ संवर्गातील उपसंचालक, व्यवसाय शिक्षण या पदासाठी २२ व २३ डिसेंबर २०२६ रोजी मुलाखती घेतल्या जाणार आहेत. या पदाची जाहिरात ३९७/२०२३ या क्रमांकाने प्रसिद्ध केली होती.

महसूल व वन विभागातील सहायक वनसंरक्षक, गट-ब पदासाठीही २२ व २३ डिसेंबर २०२६ रोजी मुलाखतींचे आयोजन केले आहे. या पदासाठी जाहिरात क्रमांक १२०/२०२३ अंतर्गत निवड प्रक्रिया राबविली आहे. या सर्व मुलाखती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या नवी मुंबई येथील सीबीडी बेलापूर कार्यालयात होणार आहेत. उमेदवारनिहाय मुलाखतींचे सविस्तर वेळापत्रक स्वतंत्रपणे प्रसिद्ध करणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.