MPSC Group C Exam | एमपीएससी गट-क पूर्वपरीक्षा पुढे ढकलली

MPSC Group C Exam | आता 3 जानेवारी 2027 रोजी सर्व जिल्ह्यांत परीक्षा
MPSC Exam
MPSC ExamPudhari
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा-२०२६ च्या तारखेत बदल केला आहे. यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार ही परीक्षा दि. २५ ऑक्टोबर २०२६ रोजी घेण्यात येणार होती. मात्र, विविध प्रशासकीय बाबींचा विचार करून आता ही परीक्षा दि. ३ जानेवारी २०२७ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांतील परीक्षा केंद्रांमध्ये घेण्यात येणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

MPSC Exam
Nashik Police | नाशिक पोलिसांची मोठी कारवाई; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 402 उपद्रवींवर हद्दपारीचा बडगा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दि. २५ जून २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार गट-क सेवेतील विविध संवर्गातील पदांसाठी संयुक्त पूर्वपरीक्षा आयोजित करण्यात येत आहे. परीक्षेची तारीख निश्चित करताना राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये परीक्षा केंद्रांची उपलब्धता, स्थानिक परिस्थिती, वाहतूक व्यवस्था तसेच परीक्षार्थींना परीक्षा केंद्रात वेळेत व सुरक्षितपणे पोहोचता येण्याची शक्यता यांचा विचार करण्यात आला आहे.

याशिवाय राज्य सेवा (मुख्य) परीक्षा - २०२६, सणासुदीचा कालावधी, इतर भरती संस्थांच्या परीक्षांचे वेळापत्रक, हिवाळी अधिवेशन आदी बाबींचाही विचार करण्यात आल्याचे आयोगाने म्हटले आहे. या सर्व बाबींचा विचार करून गट-क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा - २०२६ ही २५ ऑक्टोबरऐवजी दि. ३ जानेवारी २०२७ रोजी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

याची नोंद उमेदवारांनी घ्यावी, असे आवाहन आयोगाने केले आहे. परीक्षा केंद्र, प्रवेशपत्र, परीक्षेची वेळ, आवश्यक सूचना तसेच अन्य बाबींबाबतची माहिती आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news