Chemical Water Issue | नाशिकमध्ये बोअरवेलमधून आले पिवळे पाणी! MPCB च्या धाडीत आरती स्ट्रक्चर्सचे धक्कादायक वास्तव उघड

Chemical Water Issue | सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प नसल्याने बजावली नोटीस
Chemical Water Reaction
Chemical Water Reaction
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

अंबड एमआयडीसीतील निवासी बोअरवेलमध्ये पिवळ्या रंगाचे पाणी आल्याच्या तक्रारीची गंभीर दखल घेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने अंबड औद्योगिक वसाहतीतील 'आर्टी स्ट्रक्चर्स प्रा. लि.' या उद्योगाची पाहणी केली. पाहणीत उद्योगाचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प तसेच झिरो लिक्विड डिस्चार्ज यंत्रणाच कार्यरत नसल्याचे आढळले.

Chemical Water Reaction
Nashik Drought | चांदवड अन् नाशिक तालुका दुष्काळग्रस्त यादीत समाविष्ट होणार? जिल्हा प्रशासनाचा शासनाला अहवाल!

पिवळसर रंगाचे सांडपाणी उद्योगाबाहेरील नाल्यात सोडण्यात येत असल्याचे धक्कादायक वास्तव निदर्शनास आल्याने 'एमपीसीबी'ने जल व वायू प्रदूषण नियंत्रण कायद्यांतर्गत उद्योगाला नोटीस बजावली.
'एमपीसीबी'च्या अधिकाऱ्यांनी सोमवारी (दि. २८) संबंधित उद्योगाची पाहणी केली. त्यावेळी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यरत नसणे, झिरो लिक्विड डिस्चार्ज प्रणाली बंद असणे आणि उद्योगातून पिवळसर रंगाचे सांडपाणी थेट जवळच्या नाल्यात सोडले जात असल्याचे आढळले.

Chemical Water Reaction
Kalika Mata Yatra | नाशिक कालिकामाता नवरात्र उत्सव: रहाटपाळण्याच्या जागेचा लिलाव वादाच्या भोवऱ्यात!

हा नाला निवासी भागाच्या दिशेने वाहत असल्याने पाण्यात केमिकलयुक्त पाणी मिसळले जात असल्याचे वास्तव आढळले. उद्योगाच्या आवारात आम्लीय धुराचे अस्तित्व जाणवल्याचेही निरीक्षण नोंदवले. पिवळसर रंगाचे सांडपाणी वाहत असल्याची तक्रार 'एमपीसीबी'कडे प्राप्त झाली होती. मंडळाने ७ जुलैला उद्योगास कारण दाखवा नोटीस बजावली होती. मात्र, त्या उद्योगाने उत्तर सादर केले नसल्याचेही उघड झाले.

तर कंपनी बंद करणार:

एमपीसीबीने उद्योगाला तीन महत्त्वाच्या मुद्द्यांवर उत्तरे देण्याचे सांगितले आहे. त्यात उद्योगाची संमती रद्द का करण्यात येऊ नये, औद्योगिक कामकाज बंद का करण्यात येऊ नये, उद्योगाचा पाणी व वीजपुरवठा खंडित करण्याचे निर्देश संबंधित सक्षम प्राधिकरणाला देण्यात येऊ नये, याबाबत स्पष्टीकरण मागवले आहे. यास १५ दिवसांची मुदत दिली आहे. मुदतीत उत्तर न दिल्यास नोटीस न देता जल व वायू प्रदूषण नियंत्रण कायद्याच्या तरतुदीनुसार कायदेशीर कारवाई करू, असा इशारा देण्यात आला.

"प्रदूषण नियंत्रणाच्या दृष्टीने उद्योगाने आवश्यक यंत्रणा उपलब्ध करून मंडळाने निर्धारित केलेल्या मानकांचे पालन करणे बंधनकारक आहे. मात्र, पाहणीदरम्यान यंत्रणा कार्यरत नसल्याचे आणि सांडपाणी बाहेरील नाल्यात सोडले जात असल्याचे निदर्शनास आल्याने संबंधित उद्योगावर कारवाई करण्यात आली."

- विद्यासागर किल्लेदार, प्रादेशिक अधिकारी, एमपीसीबी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news