

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क - मौनी अमावस्येला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. हा सण दरवर्षी माघ महिन्यात साजरा केला जातो. या दिवशी पितरांना पिंडदान आणि तर्पण, अर्पण करण्याची परंपरा आहे. बुधवार (दि.29) रोजी मौनी अमावस्या असल्याने यावेळी त्रिवेणी योगासह अनेक शुभ योग तयार झाल्याने मौनी अमावस्येचे महत्त्व अनेक पटींनी वाढले आहे. तसेच यावेळी महाकुंभाचे दुसरे शाही स्नानही मौनी अमावस्येला होत आहे. तर नाशिक येथे देखील गोदावरी नदीमध्ये स्नान करण्यासाठी भाविकांची सकाळपासून रांगा लागल्या आहेत.
भाविकांच्या गर्दी लक्षात घेता सावधानतेचा इशारा म्हणून पोलीस प्रशासन अलर्ट असून ठिकठिकाणी पोलीसांचा बंदोबस्त करण्यात आलेला आहे. गोदावरी रामकुंडावर शाहीस्नान होत आहे. त्यासाठी गोदाकाठी स्नान करण्यासाठी राज्यभरातून भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी होत आहे. प्रयागराज येथे महाकुंभ सुरु असून तेथे जाऊ न शकल्याने भाविक गोदातीरी स्नान करत आहेत.